Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

युक्रेनमध्ये अडकलेल्या नाशिक जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थ्यांसाठी आवाहन

नाशिकदिनांक 25 सध्या रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून नाशिक जिल्ह्यातील कोणीही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास त्यांनी अथवा त्यांच्या निकटवर्तीयांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

देशातून युक्रेनमध्ये गेलेले अनेक नागरिक, विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून या नागरिकांसाठी केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालयाने नवी दिल्ली येथे  हेल्पलाईन्स कार्यन्वित केल्या आहेत.

केंद्रीय परराष्ट्र मंत्री कार्यालय, नवी दिल्ली

या हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

नाशिक जिल्ह्यातील कोणतेही नागरिक किंवा विद्यार्थी युक्रेन या देशात अडकले असल्यास जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय,नाशिक 0253- 2317151 या दूरध्वनी क्रमांकावर टोल फ्री. क्रमांक 1077 आणि ddmanashik@gmail.com  या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शेवटी केले आहे.

Exit mobile version