सोयाबीनचा एकरी उतारा काढण्याची सोपी पद्धत

अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनच्या एकरी उताऱ्याचा अंदाज कसा बांधावा हा प्रश्न असतो. त्याची सोपी पद्धत पंजाबराव डख यांनी तयार केली आहे. सध्या अनेक शेतकरी या पद्धतीचा वापर करत आहेत. कृषी पंढरीच्या वाचक शेतकऱ्यांच्या माहितीसाठी ही पद्धत अशी…

अशी आहे उतारा काढण्याची पद्धत

१. शेतातील कोणतेही 3 झाडांच्या शेंगा मोजा. शेंगाची बेरीज करा.

२. त्याला 3 ने भागा म्हणजे सरासरी काढा.

३. आलेल्या सरासरी ला 6 ने भागा. त्यातून एकरी सोयाबीन उतारा येईल.
उदा  : समजा शेंग ची संख्या  52+54+60 = 166
भागिले 3
166 ÷ 3 = 55.33
सरासरी 55.33 भागिला 6
55.33 ÷ 6
= 9. 22 क्विंटल एकरी सोयाबीन उतारा येईल