कृषी आणि ग्रामीण मजूरांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक –जानेवारी 2021

जानेवारी महिन्यासाठीचा, कृषी तसेच ग्रामीण  मजूरांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक अनुक्रमे 9 आणि 8 अंकांनी खाली घसरला असून कृषी मजुरांसाठीचा निर्देशांक 1038 तर ग्रामीण मजुरांसाठीचा निर्देशांक  1045 इतका झाला आहे. डाळी, कांदा, बटाटा, कोबी, वांगी अशा भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किमती घसरल्यामुळे त्यावर आधारित अन्नधान्य निर्देशांकात शेतमजुरांसाठी 12.52 तर ग्रामीण मजूरांसाठी 11.40 अंकांपर्यंत घसरण झाली आहे.

विविध राज्यांमध्ये निर्देशांकात झालेली वाढ/घट वेगवेगळी आहे.

या निर्देशांकाविषयी बोलतांना श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार म्हणाले, “की ग्राहकांच्या खरेदीक्षमतेवर आधारलेल्या सीपीआय-एएल आणि आर एल निर्देशांकात अनुक्रमे 2.17% आणि 2.35% पर्यंत झालेली घट अन्नधान्य आणि भाज्यांच्या किमती कमी झाल्यामुळे झाली आहे.

  

All-India Consumer Price Index Number (General & Group-wise)

Group Agricultural Labourers Rural  Labourers
  Dec,2020 Jan,2021 Dec,2020 Jan,2021
General Index 1047 1038 1053 1045
Food 1005 987 1010 993
Pan, Supari,  etc. 1738 1762 1749 1773
Fuel & Light 1099 1110 1094 1104
Clothing, Bedding  &Footwear 1025 1031 1045 1050
Miscellaneous 1068 1076 1071 1080

 

हा निर्देशांक जाहीर करतांना कामगार विभागाचे महासंचालक डीपीएस नेगी म्हणाले की ‘महागाई दरात झालेली ही घसरण ग्रामीण भागात काम करणाऱ्या लाखो मजुरांना मोठा दिलासा देणारी आहे.”

फेब्रुवारी महिन्यासाठीच्या ग्राहक मूल्य निर्देशांकाची आकडेवारी 19 मार्च रोजी जाहीर केली जाईल.