Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

बारामतीत कृषी तंत्रज्ञान सप्ताहास आजपासून सुरुवात

ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक- कृषी तंत्रज्ञान सप्ताहचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते आज नारळ फोडून करण्यात आला. आज (दि:९) फेब्रुवारी २०२२ वार बुधवार ते रविवार (दि: १३) फेब्रुवारी पर्यंत आयोजित कृषिक कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थित मान्यवरांनी केवीके प्रक्षेत्रावरील विविध पिकांच्या प्रात्यक्षिकाची माहिती घेतली, कंपन्या व शासकीय संस्था यांचे दालन, इनोवेशन स्टार्टर्स दालनाला भेट दिली. तेथील तरुण उद्योजकांना बरोबर चर्चा करून भीमथडी जत्रा पशुपक्षी दलनला भेट दिली.

या भव्य कृषी तंत्रज्ञान सप्ताह मध्ये एकशे दहा एकर क्षेत्रावर भाजीपाला व फुलांचे नाविन्यपूर्ण जातींची लागवड करण्यात आली आहे. तसेच संरक्षित शेतीचे विविध प्रयोग, खते देण्याच्या विविध पद्धती, एकात्मिक शेती प्रकल्प, मधुमक्षिका पालन, मत्स्य शेती, मोत्याची शेती, प्रक्रिया युक्त पदार्थ निर्मिती, नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स, Innovations, विविध जातिवंत जनावरे आणि पशुपक्ष्यांचे दालन, भरड धान्याच्या विविध जाती आणि त्याचे प्रक्रिया उद्योग, आयात-निर्यात मार्गदर्शन, औषधी वनस्पती लागवड, भाजीपाला कलमी रोपे, जातिवंत कलमी रोपांची फळरोपवाटीका, देश-विदेशातील न्यानो तंत्रज्ञान, देशी-विदेशी भाजीपाला, अत्याधुनिक मशनरी , ड्रोन द्वारे फवारणी तंत्रज्ञान, सेन्सॉर तंत्रज्ञानाचा वापर, टिशू कल्चर रोपे निर्मिती इत्यादी तंत्रज्ञान पाहून एकच ठिकाणी शेती व निगडित व्यवसाय पाहण्याची नामी संधी पुढील चार दिवस म्हणजे रविवार पर्यंत पाहवयास मिळणार आहे.

या सप्ताहा दरम्यान संस्थेचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे , कृषीमंत्री दादा भुसे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार हे सप्ताहा दरम्यान भेट देणार असल्याची माहिती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी दिली.

Exit mobile version