जवळपास 14 लाख लाभार्थ्यांना मिळाली कोविड 19ची लस
भारतातील एकूण सक्रीय रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असल्याचे आढळत आहे. आज ती 1.85 लाख (1,85,662) पर्यंत खाली आली आहे.
भारताच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.74 % इतकी भारतातील सध्याची सक्रीय रुग्णसंख्या आहे.
गेल्या 24 तासातील नव्याने होणारी रुग्णांची नोंद ही 14,256 इतकी आहे. गेल्या 24 तासात 17,130 रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यानुसार एकूण सक्रिय रुग्ण संख्येत 3,026 ने घट नोंदविली गेली आहे.
28 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये सक्रीय रुग्णांची संख्या 5,000 पेक्षा कमी आहे.
बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,03,00,838 इतकी आहे.
नवीन रुग्ण संख्येच्या तुलनेत नव्याने बरे होणाऱ्या रुग्ण संख्येतील फरकामुळे बरे होणाऱ्या रुग्ण संख्येचे प्रमाण वाढून ते आज 96.82 % इतके झाले आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या आणि सक्रिय रुग्णसंख्या यामधील अंतर सातत्याने वाढत आहे आणि सध्या ते 1,01,15,176 इतके आहे.
28 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचा दर हा राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे.
देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत 23 जानेवारी 2021 रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत जवळपास 14 लाख (13,90,592) लाभार्थ्यांनी लस घेतली आहे.
गेल्या 24 तासात, 3,47,058 लोकांनी 6,241 सत्रांमध्ये लस घेतली आहे. आतापर्यंत 24,408 लसीकरणाची सत्र झाली आहेत.
नव्याने बरे झालेल्या रुग्ण संख्येपैकी 84.30 % संख्या ही 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.
केरळमध्ये एकाच दिवशी 6,108 इतक्या अधिक संख्येने रुग्ण बरे झाल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 3,419 रुग्ण बरे झाले आहेत तर कर्नाटकमध्ये 890 इतकी बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे.
79.99 % नवीन रुग्ण संख्या ही सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहे.
केरळमधून पुन्हा सातत्याने सर्वाधिक 6,753 इतकी नवीन रुग्ण संख्येची नोंद झाली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील बाधितांची संख्या 2,779 इतकी आहे, तर तामिळनाडू येथील नवीन रुग्ण संख्या 574 इतकी आहे.
गेल्या 24 तासात 152 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.
नवीन मृत्यूंच्या नोंदीमध्ये आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग 75.66 % इतका आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (50) मृत्यूंची नोंद आहे. त्यानंतर केरळमध्ये दैनंदिन मृत्यूंची नोंद 19 इतकी आहे.