Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारतातील सक्रीय रुग्णसंख्या आज 1.7 लाखांपेक्षा कमी

35 लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण

आज भारतातील सक्रीय रुग्णसंख्या 1.7 लाख (1,69,824) पेक्षा कमी झाली आहे.

सक्रीय रुग्णांची संख्या आता देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.6 टक्क्यांपेक्षा कमी (केवळ 1.58 टक्के) आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001FKSH.jpg

9 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये बाधित रुग्णांचा साप्ताहिक दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आढळून आला आहे. केरळमध्ये बाधित रुग्णांचा साप्ताहिक दर सर्वाधिक म्हणजे 12.20 टक्के इतका आहे, त्यानंतर छत्तीसगडमध्ये तो 7.30 टक्के इतका आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002O21D.jpg

27 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये बाधिक रुग्णांचा साप्ताहिक दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003CVN6.jpg

रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने वाढ होत असताना, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर आता 97 टक्क्यांपर्यंत (97.98 टक्के) पोहोचला आहे. जागतिक स्तरावर रुग्ण बरे होण्याचा सर्वाधिक दर असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

आतापर्यंत 1.04 कोटींपेक्षा अधिक लोक (1,04,09,160) बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 14,808 रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

भारताने आपल्या कोविड 19 लसीकरण मोहिमेमध्ये देखील लक्षणीय वाढ केली आहे.

5.7 लाखांहून अधिक लोकांचे गेल्या सलग 2 दिवसांमध्ये लसीकरण करण्यात आले आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0044709.jpg

देशभरात सुरू असलेल्या कोविड 19 लसीकरण मोहिमेअंतर्गत 30 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 35 लाखांहून अधिक (35,00,027) लाभार्थ्यांनी लस घेतली आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0057Y9D.jpg

गेल्या 24 तासात, 10,809 सत्रांमध्ये 5,71,974 लोकांनी लसीकरण घेतले आहे. आतापर्यंत 63,687 सत्र पार पडली आहेत.

 

S. No. States/UTs Beneficiaries Vaccinated
1 A & N Islands 2,727
2 Andhra Pradesh 1,79,038
3 Arunachal Pradesh 9,265
4 Assam 36,932
5 Bihar 1,10,396
6 Chandigarh 2,977
7 Chhattisgarh 62,529
8 Dadra & Nagar Haveli 607
9 Daman & Diu 333
10 Delhi 48,008
11 Goa 3,391
12 Gujarat 2,21,675
13 Haryana 1,23,935
14 Himachal Pradesh 22,918
15 Jammu & Kashmir 26,634
16 Jharkhand 33,119
17 Karnataka 3,07,891
18 Kerala 1,35,835
19 Ladakh 989
20 Lakshadweep 746
21 Madhya Pradesh 2,46,181
22 Maharashtra 2,61,320
23 Manipur 3,399
24 Meghalaya 4,200
25 Mizoram 8,497
26 Nagaland 3,973
27 Odisha 2,05,200
28 Puducherry 2,299
29 Punjab 54,988
30 Rajasthan 3,24,973
31 Sikkim 2,020
32 Tamil Nadu 97,126
33 Telangana 1,66,606
34 Tripura 27,617
35 Uttar Pradesh 4,63,793
36 Uttarakhand 25,818
37 West Bengal 2,21,994
38 Miscellaneous 50,078
Total 35,00,027

 

नव्याने बरे झालेल्या रुग्णसंख्येपैकी 85.10 टक्के रुग्णसंख्या ही 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील असल्याचे आढळले आहे.

केरळमध्ये नव्याने बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या सर्वाधिक 6,398 इतकी नोंदविण्यात आली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रामध्ये 2,613 रुग्ण बरे झाले आहेत तर कर्नाटकमध्ये 607 ही बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006LZO2.jpg

गेल्या 24 तासांमध्ये 13,083 इतकी नव्याने नोंद झालेली रुग्णसंख्या आहे.

81.95 टक्के नव्या रुग्णांची संख्या 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहे.

केरळमध्ये सातत्याने दैनंदिन रुग्णसंख्या सर्वाधिक 6,268 इतकी नोंदविली गेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 2,771 इतकी नोंद आहे. तर तामिळनाडू येथे 509 इतके नवे रुग्ण आढळले आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image007MIAZ.jpg

गेल्या 24 तासातील मृत्यूंची संख्या 137 इतकी आहे.

नवीन मृत्यूंपैकी 83.94 टक्के मृत्यू सात राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील संख्या  आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (56) मृत्यूंची नोंद आहे. त्यानंतर केरळमध्ये 22 आणि पंजाबमध्ये 11 मृत्यू झाले आहेत.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0081MW4.jpg

Exit mobile version