35 लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे कोविड 19 प्रतिबंधात्मक लसीकरण
आज भारतातील सक्रीय रुग्णसंख्या 1.7 लाख (1,69,824) पेक्षा कमी झाली आहे.
सक्रीय रुग्णांची संख्या आता देशातील एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 1.6 टक्क्यांपेक्षा कमी (केवळ 1.58 टक्के) आहे.
9 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये बाधित रुग्णांचा साप्ताहिक दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आढळून आला आहे. केरळमध्ये बाधित रुग्णांचा साप्ताहिक दर सर्वाधिक म्हणजे 12.20 टक्के इतका आहे, त्यानंतर छत्तीसगडमध्ये तो 7.30 टक्के इतका आहे.
27 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये बाधिक रुग्णांचा साप्ताहिक दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे.
रुग्ण बरे होण्याच्या दरात सातत्याने वाढ होत असताना, भारतातील रुग्ण बरे होण्याचा दर आता 97 टक्क्यांपर्यंत (97.98 टक्के) पोहोचला आहे. जागतिक स्तरावर रुग्ण बरे होण्याचा सर्वाधिक दर असणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश आहे.
आतापर्यंत 1.04 कोटींपेक्षा अधिक लोक (1,04,09,160) बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांमध्ये 14,808 रुग्ण बरे झाले आहेत आणि त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
भारताने आपल्या कोविड 19 लसीकरण मोहिमेमध्ये देखील लक्षणीय वाढ केली आहे.
5.7 लाखांहून अधिक लोकांचे गेल्या सलग 2 दिवसांमध्ये लसीकरण करण्यात आले आहे.
देशभरात सुरू असलेल्या कोविड 19 लसीकरण मोहिमेअंतर्गत 30 जानेवारी 2021 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 35 लाखांहून अधिक (35,00,027) लाभार्थ्यांनी लस घेतली आहे.
गेल्या 24 तासात, 10,809 सत्रांमध्ये 5,71,974 लोकांनी लसीकरण घेतले आहे. आतापर्यंत 63,687 सत्र पार पडली आहेत.
S. No. | States/UTs | Beneficiaries Vaccinated |
1 | A & N Islands | 2,727 |
2 | Andhra Pradesh | 1,79,038 |
3 | Arunachal Pradesh | 9,265 |
4 | Assam | 36,932 |
5 | Bihar | 1,10,396 |
6 | Chandigarh | 2,977 |
7 | Chhattisgarh | 62,529 |
8 | Dadra & Nagar Haveli | 607 |
9 | Daman & Diu | 333 |
10 | Delhi | 48,008 |
11 | Goa | 3,391 |
12 | Gujarat | 2,21,675 |
13 | Haryana | 1,23,935 |
14 | Himachal Pradesh | 22,918 |
15 | Jammu & Kashmir | 26,634 |
16 | Jharkhand | 33,119 |
17 | Karnataka | 3,07,891 |
18 | Kerala | 1,35,835 |
19 | Ladakh | 989 |
20 | Lakshadweep | 746 |
21 | Madhya Pradesh | 2,46,181 |
22 | Maharashtra | 2,61,320 |
23 | Manipur | 3,399 |
24 | Meghalaya | 4,200 |
25 | Mizoram | 8,497 |
26 | Nagaland | 3,973 |
27 | Odisha | 2,05,200 |
28 | Puducherry | 2,299 |
29 | Punjab | 54,988 |
30 | Rajasthan | 3,24,973 |
31 | Sikkim | 2,020 |
32 | Tamil Nadu | 97,126 |
33 | Telangana | 1,66,606 |
34 | Tripura | 27,617 |
35 | Uttar Pradesh | 4,63,793 |
36 | Uttarakhand | 25,818 |
37 | West Bengal | 2,21,994 |
38 | Miscellaneous | 50,078 |
Total | 35,00,027 |
नव्याने बरे झालेल्या रुग्णसंख्येपैकी 85.10 टक्के रुग्णसंख्या ही 10 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील असल्याचे आढळले आहे.
केरळमध्ये नव्याने बरे झालेल्या रुग्णांची दैनंदिन संख्या सर्वाधिक 6,398 इतकी नोंदविण्यात आली आहे. गेल्या 24 तासात महाराष्ट्रामध्ये 2,613 रुग्ण बरे झाले आहेत तर कर्नाटकमध्ये 607 ही बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे.
गेल्या 24 तासांमध्ये 13,083 इतकी नव्याने नोंद झालेली रुग्णसंख्या आहे.
81.95 टक्के नव्या रुग्णांची संख्या 6 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहे.
केरळमध्ये सातत्याने दैनंदिन रुग्णसंख्या सर्वाधिक 6,268 इतकी नोंदविली गेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रात 2,771 इतकी नोंद आहे. तर तामिळनाडू येथे 509 इतके नवे रुग्ण आढळले आहे.
गेल्या 24 तासातील मृत्यूंची संख्या 137 इतकी आहे.
नवीन मृत्यूंपैकी 83.94 टक्के मृत्यू सात राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील संख्या आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (56) मृत्यूंची नोंद आहे. त्यानंतर केरळमध्ये 22 आणि पंजाबमध्ये 11 मृत्यू झाले आहेत.