Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सक्रीय रुग्णसंख्येत सातत्याने घट

भारतातील एकूण सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट झाली असून ती आता 4.10 लाख इतकी झाली आहे. ती गेल्या 136 दिवसांतील नीचांक आहे. भारतातील सक्रीय रुग्णसंख्येचे प्रमाण एकूण पॉसिटीव्ह रुग्णसंख्येच्या केवळ 4.26% इतके आहे. नवीन बरे झालेल्या रुग्णांमुळे सक्रीय रुग्णसंख्येत 6,393 इतकी घट झाली आहे.

गेल्या आठ दिवसांपासून देशात दर दिवशी नोंद झालेल्या नवीन रुग्णांपेक्षा दररोज उपचारांनंतर बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांत  36,652 नवीन रुग्ण आढळून आले, तर उपचारांनंतर  बरे होऊन घरी गेलेल्या  रुग्णांची संख्या 42,533 इतकी आहे.

बरे झालेल्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रूग्ण बरे होण्याचा दर सुधारला असून तो आज 94.28% इतका झाला आहे.

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 9,058,822 इतकी आहे.

उपचारानंतर बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी 78.06% रुग्ण  10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्यांची संख्या 6,776 इतकी आहे.

नवीन नोंद झालेल्या रुग्णांपैकी 76.90% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आढळून आले आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 5,718 इतके नवीन रुग्ण आढळून आले, त्याखालोखाल महाराष्ट्रात 5,229 नवीन रुग्ण आढळले.

गेल्या 24 तासांत 512 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांपैकी 78.32% प्रमाण दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशात आहे. सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत (127).

Exit mobile version