Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारतात एकूण 2 कोटीपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले

भारतात देण्यात आलेल्या लसीकरण मात्रांची संख्या 18 कोटीच्या जवळ

भारतात कोरोना मुक्त झालेल्यांच्या एकूण  संख्येने आज 2 कोटीचा टप्पा (2,00,79,599) पार केला आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 83.50% आहे.

गेल्या 24 तासात 3,44,776 रुग्ण बरे झाले. गेल्या चार दिवसात सलग तिसऱ्यांदा, बरे झालेल्यांची संख्या ही कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येपेक्षा जास्त आहे.

नुकत्याच बरे झालेल्यांपैकी 71.16% हे  दहा राज्यातले आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001EABF.jpg

गेल्या 14 दिवसात बऱ्या झालेल्यांची संख्या खालील आलेख दर्शवतो.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0021H35.jpg

भारतातली उपचाराधीन रुग्ण संख्या आज 37,04,893 पर्यंत घटली आहे. ही संख्या देशाच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येच्या 15.41% आहे.

गेल्या 24 तासात  उपचाराधीन रुग्ण संख्येत 5,632 ने घट झाली आहे.

देशातल्या उपचाराधीन रुग्णांपैकी  79.7%  रुग्ण 12 राज्यात आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003K6RQ.jpg

“संपूर्णतः सरकार” दृष्टीकोनाचा अवलंब करत, जागतिक पातळीवरून आलेल्या मदतीचे केंद्र सरकारकडून, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना अतिशय त्वरेने वितरण जारी आहे.  आतापर्यंत एकूण 9,294 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स, 11,835 ऑक्सिजन सिलेंडर्स, 19 ऑक्सिजन निर्मिती संयंत्रे, 6,439 व्हेंटीलेटर्स/बाय पॅप आणि रेमडेसिवीर औषधाच्या सुमारे 4.22 लाख कुप्या  रस्ते आणि हवाई मार्गाने वितरीत/ पाठवण्यात आल्या आहेत.

त्याचबरोबर कोविड -19 प्रतिबंधक लसीच्या आतापर्यंत देण्यात आलेल्या मात्रा आज 18 कोटीच्या जवळ पोहोचल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 26,02,435 सत्रांद्वारे  17,92,98,584 मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये 96,18,127 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 66,04,549 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 1,43,22,390 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा ), 81,16,153 फ्रंट लाईन कर्मचारी(दुसरी मात्रा ), 18-45 वयोगटामधले 39,26,334 लाभार्थी ( पहिली मात्रा ) 45 ते 60 वयोगटातल्या 5,66,09,783   ( पहिली मात्रा ), आणि 85,39,763 लाभार्थी (दुसरी मात्रा) 60 वर्षावरील 5,42,42,792 लाभार्थी ( पहिली मात्रा ), 1,73,18,693  (दुसरी मात्रा ), यांचा समावेश आहे.

 

HCWs 1st Dose 96,18,127
2nd Dose 66,04,549
FLWs 1st Dose 1,43,22,390
2nd Dose 81,16,153
Age Group 18-44 years 1st Dose 39,26,334
Age Group 45 to 60 years 1st Dose 5,66,09,783
2nd Dose 85,39,763
Over 60 years 1st Dose 5,42,42,792
2nd Dose 1,73,18,693
  Total 17,92,98,584

देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या एकूण मात्रांपैकी 66.75% मात्रा दहा राज्यात देण्यात आल्या आहेत.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004KH0N.jpg

गेल्या 24 तासांत 18-44 वर्षे वयोगटाच्या 4,40,706 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. आणि लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्यामध्ये  32  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये  एकूण 39,26,334 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

खाली दिलेल्या तक्त्यामध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना आतापर्यंत दिल्या गेलेल्या एकूण मात्रा दर्शवण्यात आल्या आहेत.

S. No. States Total
1 A & N Islands 1,175
2 Andhra Pradesh 2,153
3 Assam 1,48,136
4 Bihar 4,04,150
5 Chandigarh 2
6 Chhattisgarh 1,028
7 Dadra & Nagar Haveli 729
8 Daman & Diu 861
9 Delhi 5,23,094
10 Goa 1,757
11 Gujarat 4,19,839
12 Haryana 3,84,240
13 Himachal Pradesh 14
14 Jammu & Kashmir 30,169
15 Jharkhand 94
16 Karnataka 1,04,242
17 Kerala 1,149
18 Ladakh 86
19 Madhya Pradesh 1,36,346
20 Maharashtra 6,34,570
21 Meghalaya 6
22 Nagaland 4
23 Odisha 1,08,296
24 Puducherry 2
25 Punjab 5,755
26 Rajasthan 5,90,276
27 Tamil Nadu 26,467
28 Telangana 500
29 Tripura 2
30 Uttar Pradesh 3,15,928
31 Uttarakhand 67,427
32 West Bengal 17,837
Total 39,26,334

गेल्या 24 तासात 20 लाखाहून अधिक मात्रा देण्यात आल्या.

लसीकरण अभियानाच्या 118 व्या दिवशी (13 मे 2021) ला 20,27,162 लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 18,624 सत्रात 10,34,304 लाभार्थींना पहिली मात्रा  आणि 9,92,858 लाभार्थींना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

Date: 13th May, 2021 (Day-118)

HCWs 1stDose 17,022
2ndDose 33,409
FLWs 1stDose 83,628
2nd Dose 83,594
18-44 years 1st Dose 4,40,706
45 to 60 years 1stDose 3,53,966
2nd Dose 3,68,924
Over 60 years 1stDose 1,38,982
2nd Dose 5,06,931
Total Achievement 1stDose 10,34,304
2ndDose 9,92,858

खाली दिलेल्या तक्त्यात भारतात चाचण्यांमधील वाढ दर्शवण्यात आली असून आज ही संख्या 31 कोटीपेक्षा जास्त आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005F1Q3.jpg

खालील तक्त्यात दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर दर्शवण्यात आला असून या दरात थोडी घट होऊन तो 20.08% झाला आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006A39N.jpg

गेल्या 24 तासात 3,43,144  नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्णांपैकी 72.37% रुग्ण, दहा राज्यांमध्ये आहेत

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 42,582 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.त्यानंतर केरळमध्ये 39,955 तर कर्नाटकमध्ये 35,297 नव्या रुग्णांची नोंद झाली.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0076VAJ.jpg

राष्ट्रीय मृत्यू दर सध्या 1.09%.आहे.

गेल्या 24 तासात 4,000 रुग्णांचा मृत्यू झाला

यापैकी 72.70% मृत्यू दहा राज्यात आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 850  जणांचा मृत्यू झाला, कर्नाटक मध्ये 344 जणांचा मृत्यू झाला.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0084DLF.jpg

Exit mobile version