रुग्णसंख्या 2.5 लाखांहून कमी
भारतात सक्रीय रुग्ण कमी होण्याच्या मार्गात सातत्याने होत असलेली घट कायम आहे. आज सक्रीय रुग्णसंख्या 2.5 लाखांपेक्षा कमी आढळली. (2,47, 220)
भारतात सध्याच्या एकूण रुग्णसंख्येच्या 2.39% रुग्ण सक्रीय आहेत.गेल्या 24 तासांत 20,923 नवीन रुग्ण बरे होऊन घरी परतले,त्यामुळे एकूण सक्रीय रुग्णसंख्येत 2,963 ची घट झाली आहे.
29 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत सक्रीय रुग्णसंख्या 10,000 पेक्षा कमी आहे.
गेल्या 24 तासांतील नव्या रुग्णांची संख्या 18,177 इतकी आहे. तर याच कालावधीत बरे झालेल्या आणि उपचारांनंतर घरी पाठविलेल्या रुग्णांची संख्या 20,923 इतकी आहे.
बरे झालेल्यांची एकूण संख्या 99,27,310 इतकी आहे.उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांच्यातील तफावत वाढत असून ती सध्या 96,80,090 इतकी आहे.
78.10% रुग्ण 10 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत आहेत.
केरळमध्ये एका दिवसात 4,985 रुग्ण बरे झाले असून नव्याने बरे झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात 2,110 रुग्ण बरे झाले आहेत.
81.81% रुग्ण 10 राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात आहेत.
केरळमध्ये दररोज आढळणारी रूग्णसंख्या सर्वाधिक म्हणजे 5,328 इतकी आहे. त्याखालोखाल महाराष्ट्रात 3,218 नवे रूग्ण आढळले.
गेल्या 24 तासांत 217 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली .
दहा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत 69.59% रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण मृत्युमुखी पडले(51)