जाणून घेऊ यात बियाणे आणि पर्यावरण तज्ञ तुलसी गौडा यांच्याबद्दल…

कर्नाटकातील पर्यावरणतज्ज्ञ तुलसी गौडा यांनी पद्म पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. याचं कारण त्यांचा साधेपणा. त्या पारंपरिक कपड्यात आणि अनवानी पायानेच समारंभाला आल्या होत्या. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी हात जोडून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांचा तो फोटो समाजमाध्यमांमध्ये सर्वात जास्त शेअर झाला. अनेकांचा ऊर तो फोटो पाहिल्यानंतर अभिमानाने भरून आला. त्या शिकलेल्या नाहीत. पण वनस्पती आणि वनौषधींचे त्यांचे ज्ञान मोठे आहे. यामुळे त्यांना इनसायक्लोपिडीया आॅफ फॉरेस्ट अर्थातच जंगलाचा विश्वकोश म्हणून ओळखलं जातं. विशेष म्हणजे पर्यावरण संरक्षण तसेच बियाणांची गुणवत्ता ओळखण्याचे त्यांचे ज्ञान मोठ्या शास्त्रज्ञांनी आत्मसात केले आहे. भारतातील एका खेड्यातून आलेल्या तुलसी गौडा यांच्याविषयी जाणून घेऊ या.

जंगलप्रेमी आणि पर्यावरण संवर्धक तुलसी गौडा
तुलसी गौडा नामशेष होत आलेल्या वनस्पतींचे संगोपन करून तरुण पिढीला पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे काम करत आल्या आहेत. ७२ वर्षांच्या तुळशी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात किती लहान मोठी झाडे, वेली लावल्या याचे मोजमाप करता येणार नाही. महाकाय वृक्षांपासून ते लहान झुडपांपर्यंत वनस्पतींचे जंगल तयार करण्याचे अद्भुत ज्ञान त्यांच्याकडे आहे. कोणत्या झाडाला किती पाणी द्यायचे, कोणत्या प्रकारच्या मातीत कोणती झाडे आणि वनस्पती वाढतात, कोणत्या लता वेली एकमेकांना पूरक होतील, औषधी गुणधर्मांची झाडे कोणती हे सर्व त्यांना तोंडपाठ आहे. विविध वनस्पती वृक्षांचे उपयोग त्यावर अवलंबून असणारी जैवविविधता आणि पक्षी प्राण्यांना त्यांच्या या ज्ञानामुळे होणारा उपयोग या सर्वांच्या समीकरणामुळे त्यांना जंगलाच्या विश्वकोश असेही संबोधले जाते. शाळेत शिकलेल्या नसतानाही तुलशी यांचे जंगल आणि वनस्पतींचे ज्ञान एखाद्या पर्यावरणवादीशास्त्रज्ञ पेक्षा कमी नाही.

बालपण आणि प्रत्यक्ष काम
तुलसी गौडा या कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होन्नाळी गावच्या रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १९४४ मध्ये हक्काली आदिवासी कुटुंबात झाला. त्या केवळ २ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. खेळण्या बागडण्याच्या वयातच तुलसी यांना नर्सरीत रोजंदारीवर काम करावे लागले. त्यांची घरची परिस्थिती गरीब होती. त्यांनी नर्सरीत ३५ वर्षे काम केले. त्या गेल्या अनेक वषार्पासून पर्यावरणासाठी काम करत आहेत. त्यांनी वयाच्या ७० वयापर्यंत वनविभागाच्या नर्सरीची देखभाल केली. त्यांनी ३० हजार पेक्षा झाडे लावली आहेत. ार्यावरणवादी तिला मानवी जंगलाचा विश्वकोश म्हणतात, परंतु तिच्या जमातीत हलक्की वोक्कलिगा तिला वनदेवी म्हणून ओळखले जाते. तुळशी गौडा जीवनसंघषार्चे सवोत्तम उदाहरण आहे, शिक्षण आणि आधुनिक संसाधनांशिवाय जंगलात आमूलाग्र बदल घडवून आणता येतील याचे त्या मूर्तिमंत उदाहरण आहेत.