75 लाखाहून अधिक लाभार्थींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण
भारतात सक्रीय रुग्ण संख्येत मोठी घट झाली असून आज ही संख्या 1.35 लाख (1,35,926) आहे.
देशातली एकूण पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ही एकूण रुग्ण संख्येच्या 1.25% आहे. गेल्या काही आठवड्यात दिवसेंदिवस सक्रीय रुग्ण संख्येत सातत्याने घट होत आहे.
भारतात गेल्या 24 तासातल्या नव्या रुग्णांपैकी केवळ एका राज्यात 1000 पेक्षा जास्त रुग्ण आणि इतर राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात 1000 पेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली असून हे चित्र सकारात्मक आहे. दादरा नगर हवेली दमण आणि दीव,लडाख, त्रिपुरा आणि अंदमान निकोबार या 4 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात गेल्या 24 तासात एकाही नव्या रुग्णांची नोंद नाही.
गेल्या 24 तासात राज्ये/केंद्र शासित प्रदेशातल्या दैनंदिन मृत्यूतही घट दिसून येत असून 18 राज्ये/केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात, नव्या मृत्यूची नोंद नाही. 13 राज्ये/केंद्र शासित प्रदेशातल्या मृत्यूंची संख्या 1 – 5 दरम्यान आहे.
गेल्या 24 तासात देशात 9,309 नव्या रुग्णांची नोंद झाली. याच काळात 15,858 रुग्ण बरे झाले.
रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर (97.32%) हा जागतिक स्तरावरच्या सर्वोच्च स्तरापैकी एक दर म्हणून कायम आहे. बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर ही सातत्याने सुधारत आहे.
बरे झालेल्यांची एकूण संख्या 1,05,89,230 असून सक्रीय रुग्ण आणि बरे झालेल्यांची संख्या यातले अंतर सातत्याने वाढत असून ते 1,04,53,304 झाले आहे.
12 फेब्रुवारी 2021 ला सकाळी 8 वाजेपर्यंत 75 लाखाहून अधिक (75,05,010) ) लाभार्थींनी देशव्यापी कोविड-19 लसीकरण अभियाना अंतर्गत लस घेतली.
S. No. | State/UT | Beneficiaries vaccinated |
1 | A & N Islands | 3,454 |
2 | Andhra Pradesh | 3,43,813 |
3 | Arunachal Pradesh | 14,322 |
4 | Assam | 1,17,607 |
5 | Bihar | 4,48,903 |
6 | Chandigarh | 7,374 |
7 | Chhattisgarh | 2,33,126 |
8 | Dadra & Nagar Haveli | 2,698 |
9 | Daman & Diu | 1,030 |
10 | Delhi | 1,62,596 |
11 | Goa | 11,391 |
12 | Gujarat | 6,45,439 |
13 | Haryana | 1,90,390 |
14 | Himachal Pradesh | 72,191 |
15 | Jammu & Kashmir | 93,570 |
16 | Jharkhand | 1,74,080 |
17 | Karnataka | 4,77,005 |
18 | Kerala | 3,33,560 |
19 | Ladakh | 2,761 |
20 | Lakshadweep | 920 |
21 | Madhya Pradesh | 4,87,271 |
22 | Maharashtra | 6,08,573 |
23 | Manipur | 15,944 |
24 | Meghalaya | 11,642 |
25 | Mizoram | 11,046 |
26 | Nagaland | 8,371 |
27 | Odisha | 3,83,023 |
28 | Puducherry | 4,780 |
29 | Punjab | 97,668 |
30 | Rajasthan | 5,90,990 |
31 | Sikkim | 8,316 |
32 | Tamil Nadu | 2,11,762 |
33 | Telangana | 2,70,615 |
34 | Tripura | 59,438 |
35 | Uttar Pradesh | 7,63,421 |
36 | Uttarakhand | 97,618 |
37 | West Bengal | 4,53,303 |
38 | Miscellaneous | 84,999 |
Total | 75,05,010 |
आतापर्यंत 75,05,010 जणांनी लस घेतली असून यामध्ये 58,14,976 आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि 16,90,034 आघाडीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
आतापर्यंत 1,54,370 सत्रे झाली आहेत. भारताने लसीकरणाचा 70 लाखाचा टप्पा वेगाने पार केला आहे.
लसीकरण अभियानाच्या 27 व्या दिवशी ( 11 फेब्रुवारी 2021) ला 4,87,896 लाभार्थींचे 11,314 सत्रात लसीकरण झाले यामध्ये 1,09,748 आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि 3,78,148 आघाडीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दर दिवशी लसीकरण होणाऱ्या लाभार्थींच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
लसीकरण झालेल्या लाभार्थींपैकी 69%लाभार्थी 10 राज्यातले आहेत. लसीकरण झालेल्या लाभार्थींची उत्तर प्रदेशात 10.2% (7,63,421) इतकी संख्या आहे.
बरे झालेल्या पैकी 86.89% हे 6 राज्यातले आहेत.
महाराष्ट्रात एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 6,107 जण कोरोनामुक्त झाले.केरळ मध्ये 5,692 तर छत्तीसगडमध्ये 848 जण बरे झाले.
नव्या रुग्णांपैकी 79.87% रुग्ण सहा राज्यातले आहेत.
केरळमध्ये सर्वात जास्त म्हणजे दैनंदिन 5,281 रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात 652 तर तमिळनाडूत 481 रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात 87 मृत्यूंची नोंद झाली.
या मृत्यूंपैकी 75.86% मृत्यू सहा राज्यातले आहेत.
महाराष्ट्रात सर्वात जास्त 25 मृत्यूंची नोंद झाली. केरळमध्ये 16 मृत्यूंची नोंद झाली.