Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

भारतात रुग्ण बरे होण्याचा 97.54%

देशातली सध्या उपचाराधीन रुग्णसंख्या (3,63,605) ही 150 दिवसातली सर्वात कमी संख्या

देशव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत भारताने गेल्या 24 तासात 54,71,282 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 57.22 कोटीपेक्षा जास्त मात्रा (57,22,81,488) दिल्या आहेत. एकूण 63,56,785 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या आहेत.

यामध्ये यांचा समावेश आहे-

HCWs 1st Dose 1,03,52,479
2nd Dose 81,74,950
FLWs 1st Dose 1,82,98,488
2nd Dose 1,24,35,280
Age Group 18-44 years 1st Dose 21,16,61,856
2nd Dose 1,79,81,125
Age Group 45-59 years 1st Dose 12,13,60,599
2nd Dose 4,77,77,706
Over 60 years 1st Dose 8,28,12,609
2nd Dose 4,14,26,396
Total 57,22,81,488

 

देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 36,555 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,15,61,635 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोनातून बरे होण्याचा दर 97.54%, झाला असून मार्च 2020 पासूनचा हा सर्वोच्च दर आहे.

सलग 54  दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 36,571 नव्या रुग्णांची नोंद झाली.

कोरोनातून बरे होणाऱ्यांची जास्त संख्या आणि दैनंदिन नव्या रुग्णांची कमी संख्या यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली आहे. देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,63,605 असून 150 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  1.12% असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 18,86,271 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 50.26 कोटीहून अधिक (50,26,99,702) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.93% असून गेले 56  दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी 1.94% असून हा दर गेले 25 दिवस 3% पेक्षा कमी तर सलग 74  दिवस  5% पेक्षा कमी आहे.

Exit mobile version