Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 9,195 नवे रुग्ण

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.40%

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  64,61,321 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण   143.15 कोटीपेक्षा जास्त (1,43,15,35,641)  मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,52,69,126 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये यांचा समावेश आहे-

 

HCWs 1st Dose 1,03,87,197
2nd Dose 96,94,283
 

FLWs

1st Dose 1,83,85,217
2nd Dose 1,68,62,710
 

Age Group 18-44 years

1st Dose 49,64,04,904
2nd Dose 32,31,01,947
 

Age Group 45-59 years

1st Dose 19,38,12,980
2nd Dose 14,80,52,758
 

Over 60 years

1st Dose 12,09,96,702
2nd Dose 9,38,36,943
Total 1,43,15,35,641

 

गेल्या 24 तासात  7,347 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,42,51,292 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 98.40% झाला आहे.

सलग  62 दिवसांपासून 15,000  पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 9,195 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  77,002 असून  उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  0.22% असून  मार्च 2020 पासून सर्वात  कमी आहे.

देशभरात चाचण्या क्षमता  व्यापक करण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 11,67,612 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 67.52 कोटीहून अधिक  (67,52,46,143)  चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर सध्या 0.68% असून गेले   45 दिवस  1% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.79% असून   गेले  86  दिवस 2% पेक्षा कमी आणि 121 दिवस  3% पेक्षा कमी आहे.

Exit mobile version