गेल्या 24 तासात 8,895 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

गेल्या 24 तासात 1.04 कोटींहून अधिक मात्रा देण्यात आल्या

गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या एकूण 1,04,18,707 मात्रा देण्यात आल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताने 127.61 कोटी ( 1,27,61,83,065 ) मात्रांचा टप्पा पार केला आहे. 1,32,44,514 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे :

 

 

HCWs

1st Dose 1,03,84,549
2nd Dose 95,45,333
 

FLWs

1st Dose 1,83,80,785
2nd Dose 1,65,84,784
 

Age Group 18-44 years

1st Dose 46,67,10,695
2nd Dose 24,30,98,736
 

Age Group 45-59 years

1st Dose 18,67,14,877
2nd Dose 12,59,05,615
 

Over 60 years

1st Dose 11,68,80,846
2nd Dose 8,19,76,845
Total 1,27,61,83,065

 

गेल्या 24 तासात 6,918 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या प्रारंभापासून) वाढून 3,40,60,774 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.35% झाला

.

केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 160 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 8,895 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 99,155 आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.29% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 12,26,064 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 64.72 (64,72,52,850) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.80% असून गेल्या 21 दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.73% असून गेले 62 दिवस हा दर 2 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 97 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.