Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

खरीप हमीभाव खरेदीचा 85.71 लाख शेतकऱ्यांना लाभ

2020-21 च्या खरीप विपणन हंगामासाठी आधारभूत किंमतीने झालेले व्यवहार

2020-21 चा खरीप विपणन हंगाम सुरु असून सरकारने,  मागील हंगामाप्रमाणेच यंदाही किमान आधारभूत मूल्यानुसार खरीप 2020-21 च्या पिकांची खरेदी सुरू ठेवली आहे.

खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तराखंड, चंदिगड, जम्मू आणि काश्मिर, केरळ, गुजरात, आंध्र प्रदेश,छत्तीसगड,ओदिशा,मध्य प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, झारखंड, आसाम, कर्नाटक  आणि पश्चिम बंगाल  या राज्यांमध्ये तांदळाची खरेदी सुरळीत सुरु आहे. 27.01.2021पर्यंत 591.63 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त तांदळाची खरेदी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळातल्या  496.32 लाख मेट्रिक टन तांदूळ खरेदीशी तुलना करता  यंदा तांदळाच्या खरेदीमध्ये 19.20 % टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0016T6O.png

एकूण 591.63 लाख मेट्रिक टन तांदूळ  खरेदीपैकी एकट्या पंजाबचे योगदान 202.77 लाख मेट्रिक टन आहे. एकूण खरेदीच्या 34.27%  हे प्रमाण आहे.

1,11,700.70 कोटी रुपये एमएसपी मूल्याच्या खरीप विपणन हंगाम खरेदी व्यवहारातून 85.71  लाख शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0027QST.png  http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003JLVK.png

राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांच्या आधारे तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांसाठी खरीप विपणन हंगाम 2020 मध्ये 51.92 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबियांची मूल्य समर्थन योजनेनुसार (पीएसएस) खरेदी करायला मान्यता देण्यात आली आहे. तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आणि केरळ साठी 1.23 लाख मेट्रिक टन खोबरे खरेदी करायलाही  मान्यता देण्यात आली आहे. संबंधित राज्य सरकारांच्या प्रस्तावावर आधारित, गुजरात आणि तामिळनाडू यांच्यासाठीही 2020-21 साठीच्या रब्बी विपणन हंगामातल्या   2.50 लाख मेट्रिक टन डाळी, तेलबिया खरेदीला मान्यता देण्यात आली आहे.

27.01.2021 पर्यंत सरकारने नोडल एजन्सीमार्फत 3,02,498.56 मेट्रिक टन मूग आणि उडीद, तूर, भूईमुगाच्या शेंगा आणि सोयाबीन यांची 1,624.03 कोटी रुपये किमान आधारभूत मूल्याने खरेदी केली. तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात,हरियाणा आणि राजस्थानमधल्या 1,63,054  शेतकऱ्यांना याचा लाभ झाला.

27.01.2021 पर्यंत 52.40 कोटी रुपये किमान आधारभूत किमतीचे 5089 मेट्रिक टन खोबरे खरेदी करण्यात आले. कर्नाटक आणि तामिळनाडूमधल्या 3961 शेतक-यांना याचा लाभ झाला. डाळी आणि तेलबिया यांची  आवक लक्षात घेऊन संबंधित राज्ये/ केंद्र शासित प्रदेशांनी, निश्चित केलेल्या तारखेला  खरेदी सुरु करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करायला सुरवात केली आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004C52D.png   http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005UUM9.png

पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश महाराष्ट्र, गुजरात,तेलंगण, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि  कर्नाटक या राज्यातून कापसाची खरेदी सुरळीत सुरू आहे. 27.01.2021 पर्यंत 8890237 गासड्या कापसाची खरेदी करण्यात आली आहे. 25974.01 कोटी रुपये मूल्याच्या या खरेदीद्वारे 1825805 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.

http://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image006J01P.png

Exit mobile version