Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

पीक विमा योजनेंतर्गत हिंगोली, बीड, परभणी जिल्ह्यात १७ लाख शेतकऱ्यांना ८४१.६८ कोटींचे वाटप

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2021 करिता हिंगोली, बीड, परभणी जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीअंतर्गत एकूण 12.71 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी 675.31 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत झालेले नुकसान अंतर्गत 5.07 लाख शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी रूपये 170.76 कोटी रूपये वितरीत करण्यात आले आहे. काढणी पश्चात नुकसान भरपाई अंतर्गत 0.463 लाख शेतकऱ्यांना 24.58 कोटी रूपये वितरीत करण्यात आले असून उर्वरित नुकसान भरपाई वाटपाची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली.

यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य डॉ.प्रज्ञा सातव यांनी उपस्थित केला होता.

Exit mobile version