गेल्या 24 तासात 83,876 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

कोरोनामुक्तीचा दर सध्या 96.19%

गेल्या 24 तासांत लसीच्या  14 लाख 70 हजारांहून अधिक (14,70,053) मात्रा देऊन भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने  आतापर्यंत  169 कोटी 63 लाखांहून (169,63,80,755) अधिक मात्रा देण्याचा टप्पा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या  तात्पुरत्या अहवालांनुसार,

1,88,18,564 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,97,781
2nd Dose 99,03,933
Precaution Dose 36,60,707
FLWs 1st Dose 1,84,01,732
2nd Dose 1,73,20,283
Precaution Dose 47,91,948
Age Group 15-18 years 1st Dose 4,94,74,550
2nd Dose 58,41,998
Age Group 18-44 years 1st Dose 54,49,45,193
2nd Dose 41,62,01,224
Age Group 45-59 years 1st Dose 20,10,28,565
2nd Dose 17,40,94,991
Over 60 years 1st Dose 12,54,12,674
2nd Dose 10,84,67,154
Precaution Dose 64,38,022
Precaution Dose 1,48,90,677
Total 1,69,63,80,755

 

 

गेल्या 24 तासांत 1,99,054  रुग्ण कोविडमुक्त झाल्यामुळे आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून )  4,06,60,202 झाली आहे.

परिणामी, देशातील कोरोनामुक्तीचा दर 96.19% इतका आहे.

 

 

गेल्या 24 तासात 83,876  नव्या  कोरोना रुग्णांची नोंद झाली.

 

 

देशातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 11,08,938 आहे.देशात आढळलेल्या  एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी  उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 2.62% आहे.

 

 

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 11,56,363  चाचण्या करण्यात आल्या.भारताने आतापर्यंत एकूण  74 कोटी 15 लाखांपेक्षा अधिक  (74,15,61,587)  चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या  9.18% आहे आणि  दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 7.25% नोंदविण्यात आला आहे.