सध्या देशातील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या 1,02,601
देशात गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या एकूण 5 लाखांपेक्षा अधिक मात्रा (4,90,321) देण्यात आल्या असून , त्यामुळे आतापर्यंत लसींच्या मात्रा घेणाऱ्यांची एकूण संख्या 177.50 कोटींच्या वर (1,77,50,86,335) पोहोचली असल्याचे आज सकाळी सात वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे.
एकूण 2,03,49,590 सत्राद्वारे ह्या मात्रा देण्यात आल्या. सकाळी सात वाजेपर्यंतच्या अहवालानुसार, लसीकरणाच्या गटनिहाय वर्गवारीनुसार ताजी आकडेवारी खालीलप्रमाणे :
Cumulative Vaccine Dose Coverage | ||
HCWs | 1st Dose | 1,04,01,535 |
2nd Dose | 99,66,398 | |
Precaution Dose | 41,70,997 | |
FLWs | 1st Dose | 1,84,09,452 |
2nd Dose | 1,74,41,370 | |
Precaution Dose | 62,17,332 | |
Age Group 15-18 years | 1st Dose | 5,47,94,459 |
2nd Dose | 2,74,87,370 | |
Age Group 18-44 years | 1st Dose | 55,17,49,258 |
2nd Dose | 44,38,98,708 | |
Age Group 45-59 years | 1st Dose | 20,22,64,101 |
2nd Dose | 18,00,84,662 | |
Over 60 years | 1st Dose | 12,64,03,004 |
2nd Dose | 11,21,74,641 | |
Precaution Dose | 96,23,048 | |
Precaution Dose | 2,00,11,377 | |
Total | 1,77,50,86,335 |
गेल्या 24 तासात,16,765 रुग्ण बरे झाले आहेत, त्यामुळे महामारीच्या सुरुवातीपासून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 4,23,07,686 इतकी झाली आहे.
परिणामी, रुग्ण बरे होण्याचा दर 98.56% इतका झाला आहे.
गेल्या 24 तासात 8,013 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
देशात सध्या 1,02,601 उपचाराधीन रुग्ण आहेत. देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.24% आहे.
देशभरात कोविड चाचण्या करण्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. गेल्या 24 तासात, एकूण 7,23,828 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. भारतात आतापर्यंत 76.74 कोटींपेक्षा अधिक (76,74,81,346) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली असून, सध्या देशात कोविडचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर 1.17% इतका तर दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 1.11% इतका आहे.