Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासात 7,495 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 139.70 कोटी मात्रांचा टप्पा केला पार

गेल्या 24 तासात  70,17,671 मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने

भारताने 139.70  (1,39,69,76,774)  कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार,1,47,94,783 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

HCWs

1st Dose 96,63,508
2nd Dose 96,63,508
 

FLWs

1st Dose 1,83,84,490
2nd Dose 1,68,03,025
 

Age Group 18-44 years

1st Dose 49,01,96,714
2nd Dose 30,48,04,894
 

Age Group 45-59 years

1st Dose 19,23,57,199
2nd Dose 14,30,83,204
 

Over 60 years

1st Dose 12,01,61,788
2nd Dose 9,11,35,308
Total 1,39,69,76,774

गेल्या 24 तासांत 6,960 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,42,08,926 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.40% झाला आहे. मार्च 2020 पासूनचा हा सर्वाधिक दर आहे.

केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 56 दिवसांपासून 15,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 7,495 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या  78,291 आहे.  देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.23% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 12,05,775  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 66.86 (66,86,43,929) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.59% असून गेल्या 39 दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.62% असून गेले 80 दिवस हा दर 2 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 115 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.

Exit mobile version