आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त तात्पुरत्या अहवालानुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या 32,90,766 मात्रा देऊन,भारतातील कोविड-19 लसीकरण व्याप्तीने 141.37 कोटी (1,41,37,72,425) मात्रांचा टप्पा पार केला. 1,50,19,426 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
HCWs | 1st Dose | 1,03,86,889 |
2nd Dose | 96,78,711 | |
FLWs |
1st Dose | 1,83,84,805 |
2nd Dose | 1,68,32,147 | |
Age Group 18-44 years |
1st Dose | 49,31,81,327 |
2nd Dose | 31,37,54,574 | |
Age Group 45-59 years |
1st Dose | 19,30,37,920 |
2nd Dose | 14,54,97,411 | |
Over 60 years |
1st Dose | 12,05,58,233 |
2nd Dose | 9,24,60,408 | |
Total | 1,41,37,72,425 |
गेल्या 24 तासांत 7,091कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्येत (महामारीच्या आरंभापासून ) वाढ होऊन ती 3,42,30,354.झाली आहे.
परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.40% इतका आहे, जो मार्च 2020 पासून सर्वाधिक आहे.
केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांमुळे गेल्या 59 दिवसांपासून दररोज 15,000 पेक्षा कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद होण्याचा कल कायम आहे. .
गेल्या 24 तासात 6,987 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.
भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 76,766 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.22% आहे आणि हे प्रमाण मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.
देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 9,45,455 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 67.19 कोटींपेक्षा जास्त (67,19,97,082) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवली जात असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.62% असून गेल्या 42 दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.74% असून गेले सलग 83 दिवस हा दर 2 % पेक्षा कमी आणि गेले 118 दिवस 3% पेक्षा कमी राहिला आहे.