गेल्या 24 तासात 67,597 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 96.46%

गेल्या 24 तासात  55.78  (55,78,297) लाख मात्रांचे कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण झाल्याने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारताने 170.21 (1,70,21,72,615)  कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. 1,89,63,092 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,98,100
2nd Dose 99,07,584
Precaution Dose 37,00,573
FLWs 1st Dose 1,84,02,343
2nd Dose 1,73,29,337
Precaution Dose 48,84,424
Age Group 15-18 years 1st Dose 4,99,87,314
2nd Dose 75,90,456
Age Group 18-44 years 1st Dose 54,55,09,057
2nd Dose 41,79,67,945
Age Group 45-59 years 1st Dose 20,11,27,430
2nd Dose 17,44,55,783
Over 60 years 1st Dose 12,54,87,208
2nd Dose 10,86,83,344
Precaution Dose 67,41,717
Precaution Dose 1,53,26,714
Total 1,70,21,72,615

गेल्या 24 तासांत 1,80,456 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,08,40,658

झाली आहे. परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 96.46% झाला आहे.

गेल्या 24 तासात 67,597 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या  9,94,891 आहे.  देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 2.35% आहे.


देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 13,46,534  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 74.29  (74,29,08,121) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

 

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 8.30% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 5.02% आहे.