Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6,563 नवे रुग्ण

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.39%

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  15,82,079 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण   137.67 कोटीपेक्षा जास्त  (1,37,67,20,359) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,44,91,123 सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये यांचा समावेश आहे-

 

 

HCWs

1st Dose 1,03,86,261
2nd Dose 96,45,996
 

FLWs

1st Dose 1,83,83,973
2nd Dose 1,67,72,043
 

Age Group 18-44 years

1st Dose 48,68,79,459
2nd Dose 29,37,59,017
 

Age Group 45-59 years

1st Dose 19,15,95,978
2nd Dose 14,00,66,251
 

Over 60 years

1st Dose 11,97,15,150
2nd Dose 8,95,16,231
Total 1,37,67,20,359

 

गेल्या 24 तासात 8,077 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण  3,41,87,017 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर  98.39% झाला आहे.

सलग  53 दिवसांपासून  15,000  पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

 गेल्या 24 तासात 6,563 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  82,267  असून  572  दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  0.24% असून  मार्च 2020 पासून सर्वात  कमी आहे.

देशभरात चाचण्या क्षमता  व्यापक करण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 8,77,055  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 66.51  कोटीहून अधिक  (66,51,12,580)  चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 0.60%  असून गेले   36 दिवस  1% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.75%.  असून गेले 77  दिवस 2% पेक्षा कमी आणि  112  दिवस  3% पेक्षा कमी आहे.

Exit mobile version