भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 69,897
गेल्या 24 तासात 24.84 (24,84,412) लाख लसीींच्या मात्रा देण्यात आल्याने भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 178.29 (1,78,29,13,060) कोटी मात्रा देण्याचा टप्पा पार केला आहे.
2,06,05,684 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage | ||
HCWs | 1st Dose | 1,04,01,859 |
2nd Dose | 99,71,780 | |
Precaution Dose | 42,14,216 | |
FLWs | 1st Dose | 1,84,10,046 |
2nd Dose | 1,74,51,962 | |
Precaution Dose | 63,12,690 | |
Age Group 15-18 years | 1st Dose | 5,51,46,865 |
2nd Dose | 2,94,46,462 | |
Age Group 18-44 years | 1st Dose | 55,22,22,294 |
2nd Dose | 44,72,33,716 | |
Age Group 45-59 years | 1st Dose | 20,23,40,255 |
2nd Dose | 18,08,32,789 | |
Over 60 years | 1st Dose | 12,64,67,129 |
2nd Dose | 11,26,18,005 | |
Precaution Dose | 98,42,992 | |
Precaution Dose | 2,03,69,898 | |
Total | 1,78,29,13,060 |
गेल्या 24 तासांत 13,450 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,23,67,070 झाली आहे.
परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.64% झाला आहे.
गेल्या 24 तासात 6,396 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 69,897 आहे. देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.16% आहे.
देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 9,23,351 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 77 कोटी 9 लाखांहून (77,09,73,356) लाखांहून अधिक चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.90% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.69% आहे.