देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 5,326 नवे रुग्ण

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 138.35 कोटीहून अधिक

भारताने गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या  64,56,911 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण 138.35 कोटीपेक्षा जास्त  (1,38,34,78,181) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,46,27,925 सत्रांद्वारे मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांचा समावेश पुढील सारणीत  आहे-

HCWs 1st Dose 1,03,86,424
2nd Dose 96,51,589
 

FLWs

1st Dose 1,83,84,161
2nd Dose 1,67,81,405
 

Age Group 18-44 years

1st Dose 48,80,25,346
2nd Dose 29,74,18,621
 

Age Group 45-59 years

1st Dose 19,18,58,896
2nd Dose 14,10,65,936
 

Over 60 years

1st Dose 11,98,64,939
2nd Dose 9,00,40,864
Total 1,38,34,78,181

गेल्या 24 तासात 8,043 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,41,95,060 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर 98.40% झाला आहे, गेल्या मार्च 2020 पासूनचा हा सर्वात अधिक दर आहे.

 

सलग 54 दिवसांपासून 15,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 5,326 नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या 581 दिवसांतील ही सर्वात कमी संख्या आहे.

 

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या  79,097 असून 574  दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे. उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.23% असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

 

देशभरात चाचणी क्षमता व्यापक करण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 10,14,079 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 66.61 कोटीहून अधिक  (66,61,62,659) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 0.59% असून गेले   37 दिवस 1% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 0.53% असून गेले 78  दिवस 2% पेक्षा कमी आणि  113  दिवस 3% पेक्षा कमी आहे.