देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 43,654 नवे दैनंदिन रुग्ण

भारतात कोरोना प्रतिबंधक एकूण लसीकरण 44.61 कोटीपेक्षा जास्त झाले आहे. आज सकाळी 8  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 53,73,439 सत्रांद्वारे  44,61,56,659 मात्रा देण्यात आल्या आहेत.गेल्या 24 तासात 40,02,358 मात्रा देण्यात आल्या.

HCWs 1st Dose 1,02,93,723
2nd Dose 77,53,002
FLWs 1st Dose 1,79,07,362
2nd Dose 1,10,20,080
Age Group 18-44 years 1st Dose 14,44,83,609
2nd Dose 68,86,188
Age Group 45-59 years 1st Dose 10,25,21,263
2nd Dose 3,62,42,655
Over 60 years 1st Dose 7,41,18,104
2nd Dose 3,49,30,673
Total 44,61,56,659

यामध्ये यांचा समावेश आहे-

21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा  टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,06,63,147 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात 41,678 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचा दर 97.39% आहे.

गेल्या 24 तासात 43,654 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली.

सलग 31 दिवस 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,99,436 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या  1.27% आहेत.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ करत देशात गेल्या 24 तासात 17,36,857 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 46 कोटीहून अधिक (46,09,00,978) चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.36% आणि दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर आज 2.51% आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर सलग 51 व्या दिवशी 5% पेक्षा कमी आहे.