Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 43, 263 नवे दैनंदिन रुग्ण

रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.48 %

आज सकाळ 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार देशात कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाअंतर्गत गेल्या 24 तासात 86,51,701 मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण मात्रांची संख्या 71.65 कोटी (71,65,97,428) वर पोहोचली आहे. एकूण 73,56,173 सत्रांच्या माध्यमातून या लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे –

 

HCWs 1st Dose 1,03,62,250
2nd Dose 85,38,334
 

FLWs

1st Dose 1,83,34,029
2nd Dose 1,37,98,266
 

Age Group 18-44 years

1st Dose 28,64,51,739
2nd Dose 3,87,13,940
 

Age Group 45-59 years

1st Dose 14,03,00,422
2nd Dose 6,05,11,083
 

Over 60 years

1st Dose 9,14,48,566
2nd Dose 4,81,38,799
Total 71,65,97,428

कोविड – 19 लसीकरणाची व्याप्ती वाढविण्यासाठी आणि देशभरात त्याचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 40,567 रुग्ण बरे झाल्यामुळे, महामारीच्या प्रारंभीपासून आतार्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3,23,04,618 वर गेली आहे.

परिणामी, भारातात रुग्ण बरे होण्याचा दर 97.48 % झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 74  दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासात 43,263 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,93,614 असून एकूण बाधित रुग्णांच्या 1.19 % आहे.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ सुरू असून गेल्या 24 तासात 18,17,639   चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारताने तापर्यंत 53.68 कोटीहून अधिक (53,68,17,243) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.43 % असून गेले 76 दिवस 3 % पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 2.38 % असून गेले 94 दिवस 5 % पेक्षा कमी आहे.

Exit mobile version