कोविड 19 महामारी विरुद्ध लढाईत भारताने एक महत्त्वपूर्ण शिखर गाठले आहे. एकूण लसीकरण 4 कोटींच्या पुढे गेले आहे.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत मिळालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार 6,86,469 सत्रांद्वारे 4,20,63,392 लसींचे डोस देण्यात आले आहेत.
यात 77,06,839 एचसीडब्ल्यू (1 ला डोस), 48,04,285 एचसीडब्ल्यू (दुसरा डोस), 79,57,606 एफएलडब्ल्यू (1 ला डोस) आणि 24,17,077 एफएलडब्ल्यू (दुसरा डोस), अन्य विशिष्ट आजार असलेल्या 45 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 32,23,612 लाभार्थी (पहिला डोस) आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील 1,59,53,973 लाभार्थीचा समावेश आहे.
HCWs | FLWs | 45 to < 60 years with Co-morbidities | Over 60 years |
Total |
||
1st Dose | 2nd Dose | 1st Dose | 2nd Dose | 1st Dose | 1st Dose | |
77,06,839 | 48,04,285 | 79,57,606 | 24,17,077 | 32,23,612 | 1,59,53,973 | 4,20,63,392 |
लसीकरण मोहिमेच्या-63 व्या दिवशी (19 मार्च, 2021) 27,23,575 लसीचे डोस देण्यात आले.
38,989 सत्रांमधून एकूण, 24,15,800 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस (एचसीडब्ल्यू आणि एफएलडब्ल्यू) देण्यात आला आणि 3,07,775 एचसीडब्ल्यू आणि एफएलडब्ल्यूंना लसीचा दुसरा डोस देण्यात आला.
Date: 19th March,2021 | |||||||
HCWs | FLWs | 45to<60yearswithCo-morbidities | Over60years | Total Achievement | |||
1stDose | 2ndDose | 1stDose | 2nd Dose | 1stDose | 1stDose | 1stDose | 2ndDose |
71,651 | 89,112 | 1,24,328 | 2,18,663 | 4,43,614 | 17,76,207 | 24,15,800 | 3,07,775 |
18 मार्च 2021 पर्यंत, देशभरात देण्यात आलेल्या लसींच्या एकूण डोसची संख्या 39.34 दशलक्ष होती. कोणत्याही देशाने दिलेल्या लसीच्या डोसच्या संख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर (अमेरिकेनंतर) आहे.
आतापर्यंत दिलेल्या लसीच्या दुसऱ्या डोसपैकी 68 % डोस दहा राज्यांमध्ये देण्यात आले आहेत.
गेल्या 24 तासात दिलेल्या लसीच्या 27.23 लाख डोसपैकी 80% डोस हे 10 राज्यांमध्ये देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांत कोविडच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.
गेल्या 24 तासांत नोंदविण्यात आलेल्या नवीन रुग्णांपैकी 83.7 टक्के रुग्ण सहा राज्यांमधील आहेत.
गेल्या 24 तासांत 40,953 नवीन रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात 25,681 इतक्या सर्वाधिक संख्येने नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल पंजाबमध्ये 2,470 तर केरळमध्ये 1,984 नवीन रुग्ण आढळले आहेत.
दररोजच्या नवीन प्रकरणांचा वाढता आलेख आठ राज्यांमध्ये दिसून येतो. ही राज्ये आहेत- महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली, गुजरात, कर्नाटक आणि हरियाणा.
केरळमध्ये सातत्याने रुग्णसंख्येत घसरण दिसून येत आहे.
भारताची एकूण सक्रिय रुग्णसंख्या आज 2,88,394 वर पोहचली, जी एकूण बाधित रुग्णसंख्येच्या 2.50 टक्के आहे. गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येत 17,112 ने वाढ झाली आहे.
महाराष्ट्र, केरळ आणि पंजाबमध्ये भारताच्या एकूण सक्रिय रुग्णसंख्येच्या 76.22 % आहे.
देशात आजपर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1,11,07,332 वर गेली आहे. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 96.12 % आहे. गेल्या 24 तासांत 23,653 रुग्ण बरे झाले आहेत.
गेल्या चोवीस तासांत 188 मृत्यूची नोंद झाली आहे.
नवीन मृत्यूंमध्ये पाच राज्यांचे प्रमाण 81.38% आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 70 मृत्यूंची नोंद झाली आहे. पंजाबमध्ये काल 38 तर केरळमध्ये 17 मृत्यूची नोंद झाली आहे.
पंधरा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी गेल्या 24 तासांत एकही कोविड 19 मृत्यूची नोंद केलेली नाही. ही राज्ये आहेत- आसाम, उत्तराखंड, ओदिशा, पुदुच्चेरी, लक्षद्वीप, सिक्किम, लडाख (केंद्रशासित प्रदेश), मणिपूर, दमण आणि दीव आणि दादरा आणि नगर हवेली, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबार बेटे आणि अरुणाचल प्रदेश.