Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासात 30,615 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 173.86 कोटी मात्रांचा टप्पा केला पार

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 3,70,240

कोरोनामुक्तीचा दर सध्या 97.94%

आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या 41.54 लाखांहून अधिक (41,54,476) मात्रा देऊन भारतातील कोविड-19  प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 173.86  कोटी (1,73,86,81,675) मात्रांचा टप्पा पार केला आहे.

1,95,98,966 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,99,960
2nd Dose 99,39,631
Precaution Dose 39,47,365
FLWs 1st Dose 1,84,06,271
2nd Dose 1,73,92,895
Precaution Dose 55,72,301
Age Group 15-18 years 1st Dose 5,27,06,855
2nd Dose 1,75,85,751
Age Group 18-44 years 1st Dose 54,90,49,014
2nd Dose 42,99,79,799
Age Group 45-59 years 1st Dose 20,18,15,183
2nd Dose 17,70,80,381
Over 60 years 1st Dose 12,60,29,897
2nd Dose 11,03,22,289
Precaution Dose 84,54,083
Precaution Dose 1,79,73,749
Total 1,73,86,81,675

 

गेल्या 24 तासांत 82,988 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या  (महामारीच्या आरंभापासून) 4,18,43,446 झाली आहे.
परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 97.94%.इतका आहे.

गेल्या 24 तासात 30,615 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 3,70,240 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.87% आहे.

 

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 12,51,677 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 75.42 कोटींपेक्षा जास्त (75,42,84,979) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.32% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 2.45% नोंदविण्यात आला आहे.

Exit mobile version