भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 173.86 कोटी मात्रांचा टप्पा केला पार
भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 3,70,240
कोरोनामुक्तीचा दर सध्या 97.94%
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या 41.54 लाखांहून अधिक (41,54,476) मात्रा देऊन भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 173.86 कोटी (1,73,86,81,675) मात्रांचा टप्पा पार केला आहे.
1,95,98,966 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage | ||
HCWs | 1st Dose | 1,03,99,960 |
2nd Dose | 99,39,631 | |
Precaution Dose | 39,47,365 | |
FLWs | 1st Dose | 1,84,06,271 |
2nd Dose | 1,73,92,895 | |
Precaution Dose | 55,72,301 | |
Age Group 15-18 years | 1st Dose | 5,27,06,855 |
2nd Dose | 1,75,85,751 | |
Age Group 18-44 years | 1st Dose | 54,90,49,014 |
2nd Dose | 42,99,79,799 | |
Age Group 45-59 years | 1st Dose | 20,18,15,183 |
2nd Dose | 17,70,80,381 | |
Over 60 years | 1st Dose | 12,60,29,897 |
2nd Dose | 11,03,22,289 | |
Precaution Dose | 84,54,083 | |
Precaution Dose | 1,79,73,749 | |
Total | 1,73,86,81,675 |
गेल्या 24 तासांत 82,988 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून) 4,18,43,446 झाली आहे.
परिणामी, भारतातील कोरोनामुक्तीचा दर 97.94%.इतका आहे.
गेल्या 24 तासात 30,615 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली
भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 3,70,240 आहे. देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.87% आहे.
देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे. गेल्या 24 तासात एकूण 12,51,677 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 75.42 कोटींपेक्षा जास्त (75,42,84,979) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.32% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर देखील 2.45% नोंदविण्यात आला आहे.