देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 30,256नवे दैनंदिन रुग्ण

भारतात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण 80.85 कोटीहून अधिक

भारताने गेल्या 24 तासात  37,78,296 मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7  वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार भारताने आतापर्यंत एकूण   80कोटीचा (80,85,68,144) महत्वाचा टप्पा पार केला आहे. एकूण 79,78,302 सत्रांद्वारे  मात्रा देण्यात आल्या  आहेत.

यामध्ये यांचा समावेश आहे-

 

HCWs 1st Dose 1,03,68,967
2nd Dose 87,29,932
 

FLWs

1st Dose 1,83,45,002
2nd Dose 1,45,04,111
 

Age Group 18-44 years

1st Dose 32,70,72,826
2nd Dose 6,01,11,629
 

Age Group 45-59 years

1st Dose 15,09,55,764
2nd Dose 6,91,16,028
 

Over 60 years

1st Dose 9,69,24,214
2nd Dose 5,24,39,671
Total 80,85,68,144

देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे.

गेल्या 24 तासात 43,938 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,27,15,105

रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

कोरोनातून बरे होण्याचा दर  97.72%.झाला आहे.

सलग  85  दिवसांपासून  50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 30,256 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,18,181आहे.उपचाराधीन रुग्ण, आतापर्यंतच्या एकूण पॉझिटीव्ह रुग्णांच्या 0.95% आहेत.

देशभरात चाचण्या  करण्याच्या क्षमतेत वाढ सुरु असून देशात गेल्या 24 तासात 11,77,607चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 55.36कोटीहून अधिक  (55,36,21,766) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.07% असून गेले 87  दिवस 3% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.57%.असून गेले 21  दिवस 3% पेक्षा कमी आणि 104 दिवस  5% पेक्षा कमी आहे.