Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासात 27,409 नव्या रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 97.82%

भारतात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,23,127

गेल्या 24 तासांच्या कालावधीत, कोविड प्रतिबंधक लसीच्या 44 लाख 68 हजारांहून अधिक (44,68,365) मात्रा देण्यात आल्यामुळे, आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांच्या संख्येने 173 कोटी 42  लाखांचा (1,73,42,62,440) टप्पा ओलांडला आहे.

देशभरात 1,95,26,899 सत्रांच्या आयोजनातून हे उद्दिष्ट साध्य करण्यात आले.आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढीलप्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,99,701
2nd Dose 99,36,148
Precaution Dose 39,15,704
FLWs 1st Dose 1,84,05,767
2nd Dose 1,73,85,665
Precaution Dose 54,69,127
Age Group 15-18 years 1st Dose 5,24,34,558
2nd Dose 1,64,08,841
Age Group 18-44 years 1st Dose 54,86,62,133
2nd Dose 42,84,21,369
Age Group 45-59 years 1st Dose 20,17,43,879
2nd Dose 17,67,34,511
Over 60 years 1st Dose 12,59,75,745
2nd Dose 11,01,10,398
Precaution Dose 82,58,894
Precaution Dose 1,76,43,725
Total 1,73,42,62,440

 

गेल्या 24 तासात 82,817 रुग्ण बरे झाले आहेत आणि बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या( महामारीची सुरुवात झाल्यापासून) आता4,17,60,458 झाली आहे.

त्यामुळे आता भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर 97.82% झाला आहे.

गेल्या 24 तासात 27,409 नव्या रुग्णांची नोंद झाली.

 

भारतात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 4,23,127 आहे. उपचाराधीन रुग्णसंख्येचे प्रमाण देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या 0.99% आहे.

 

कोविड संसर्ग तपासणी चाचण्यांच्या क्षमतेच्या विस्ताराचे काम देशभरात सुरु आहे. गेल्या 24 तासांत देशात एकूण 12,29,536 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 75 कोटी 30 लाखांहून अधिक (75,30,33,302) चाचण्या करण्यात आल्या आहेत.

देशभरात कोविड संसर्ग तपासणी चाचण्या करण्याची क्षमता वाढविली जात असतानाच, देशातील साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 3.%63 आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 2.23%.इतका आहे.

Exit mobile version