Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोरोना प्रतिबंधक लसीच्या देशभरात 2.4 कोटी मात्रा

गेल्या 24 तासात लसीच्या 13.5  लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थींना देण्यात आल्या

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू येथे दैनंदिन कोविड  रुग्ण संख्येत मोठी वाढ

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार, राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात  2.43 कोटी पेक्षा जास्त म्हणजे (2,43,67,906) लसीच्या मात्रा 3,39,145 सत्राद्वारे देण्यात आल्या.

यामध्ये 71,30,098 आरोग्य कर्मचारी ( पहिली मात्रा ), 38,90,257 आरोग्य कर्मचारी (दुसरी मात्रा ), 69,36,480 फ्रंट लाईन कर्मचारी ( पहिली मात्रा ), 4,73,422 फ्रंट लाईन कर्मचारी(दुसरी मात्रा ), 8,33,526 जण 45 पेक्षा जास्त वय असलेल्या आणि सहव्याधी  असलेले ( पहिली मात्रा ), आणि  60 वर्षावरील 51,04,123 लाभार्थी  ( पहिली मात्रा ) यांचा समावेश आहे.

HCWs FLWs 45 to <60 years with Co-morbidities Over 60 years  

Total

1st Dose 2nd Dose 1st Dose 2nd Dose 1st Dose 1st Dose
71,30,098 38,90,257 69,36,480 4,73,422 8,33,526 51,04,123 2,43,67,906

लसीकरण अभियानाच्या 53 व्या दिवशी (9 मार्च   2021) ला 13.5 लाखाहून अधिक (13,59,173) लसीकरण मात्रा देण्यात आल्या. यामध्ये 10,60,944 लाभार्थींना 52,351 सत्रात पहिली मात्रा ( आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचारी ) आणि 2,98,229 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा  देण्यात आली.

Date: 9th March, 2021
HCWs FLWs 45 to <60 years with Co-morbidities Over 60 years Total Achievement
1stDose 2ndDose 1stDose 2nd Dose 1stDose 1stDose 1stDose 2ndDose
55,088 1,50,779 1,44,161 1,47,450 1,31,717 7,29,978 10,60,944 2,98,229

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यात दैनंदिन कोविड  रुग्ण संख्येत वाढ झाली आहे.

गेल्या 24 तासात 17,921 नव्या रुग्णांची नोंद झाली

यापैकी 83.76%  रुग्ण या सहा राज्यांमधले आहेत.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 9,927 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर केरळ 2,316,तर  पंजाबमध्ये  1,027  नव्या रुग्णांची नोंद झाली.

नव्या रुग्ण संख्येत आठ राज्यांचा आलेख चढता आहे.

भारतातली  एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज 1.84 लाख (1,84,598) आहे.

खालील आलेख 17 जानेवारी 2021 ते 10 मार्च 2021 या काळातला सक्रीय रुग्ण संख्येतला दैनंदिन बदल दर्शवतो.

दर दिवशी कोविड चाचण्यांच्या संख्येचा चढता आलेख  आहे. भारतात एकूण 22 कोटीपेक्षा जास्त (22,34,79,877) चाचण्या झाल्या आहेत.

दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर सध्या 2.43%. आहे.

गेल्या 24 तासात 133 मृत्यू झाले.

यापैकी 77.44%  मृत्यू पाच राज्यातले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त 56 मृत्यू झाले तर पंजाब मध्ये 20 आणि केरळमध्ये 16 मृत्यूंची नोंद झाली.

19 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात गेल्या 24 तासात कोविड-19 च्या एकाही रुग्णांची नोंद नाही.

राजस्थान, आंध्र प्रदेश, चंदीगड, ओदिशा, उत्तराखंड, झारखंड, बिहार, पुडुचेरी, लक्षद्वीप, सिक्किम, लडाख (केंद्र शासित प्रदेश ), मणिपूर, मेघालय, नागालँड, दमण दीव आणि दादरा नगर हवेली, त्रिपुरा, मिझोरम, अंदमान निकोबार आणि अरुणाचल प्रदेश यांचा यात समावेश आहे.

Exit mobile version