Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

गेल्या 24 तासांत 18,987 नवे रुग्ण आढळले

corona vaccination

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.07%; मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर

गेल्या 24 तासांत देशभरात 35,66,347 लसींच्या मात्रा देण्यात आल्या असून, त्यामुळे आज सकाळी सात वाजताच्या आकडेवारीवरुन, भारतातील लसीकरणाचा आकडा 96.82 कोटींपेक्षा (96,82,20,997) अधिक झाला आहे. 94,82,108 सत्रांमधून हे लसीकरण करण्यात आले आहे.

सकाळी सात वाजताच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, लसीकरणाची वर्गवारीनुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे :

HCWs 1st Dose 1,03,75,639
2nd Dose 90,58,495
 

FLWs

1st Dose 1,83,60,413
2nd Dose 1,54,56,207
 

Age Group 18-44 years

1st Dose 39,01,04,011
2nd Dose 10,70,45,167
 

Age Group 45-59 years

1st Dose 16,69,84,547
2nd Dose 8,49,05,479
 

Over 60 years

1st Dose 10,53,36,375
2nd Dose 6,05,94,664
Total 96,82,20,997

गेल्या 24 तासांत, 19,808 रुग्ण कोविडमधून बरे झाले आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 3,33,62,709 इतकी झाली आहे. पर्यायाने, सध्या भारतात रुग्ण बरे होण्याचा दर, 98.07% इतका झाला आहे. हा दर मार्च 2020 पासूनचा सर्वोच्च दर आहे.

केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, गेल्या सलग 109 दिवसांपासून, रुग्ण बरे होण्याचा दर, 50,000 पेक्षा कमी असल्याचे प्रमाण कायम राहिले आहे.

गेल्या 24 तासांत 18,987 नवे रुग्ण आढळले आहेत.

सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या 2,06,586 इतकी असून, गेल्या 215 दिवसातली ही सर्वात कमी लोकसंख्या आहे. सध्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत, उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण, 0.61% इतके आहे.
देशभरात, कोविड चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत, 13,01,083 चाचण्या करण्यात आले. भारतात आतापर्यंत एकूण, 58.76 कोटींपेक्षा अधिक (58,76,64,525) चाचण्या झाल्या आहेत.

देशभरात चाचण्यांची संख्या वाढवली जात असतांनाच, साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर देखील, सलग 111 दिवस, 3% पेक्षा कमी म्हणजे 1.44% इतका आहे. दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर देखील सलग 45 दिवस 3% पेक्षा कमी राहिलेला आहे. आणि सलग 128 दिवस 5% पेक्षा कमी राहिला आहे.

Exit mobile version