Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1,67,059 नवे रुग्ण

भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 94. 60%

देशात ,  गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 61 लाखाहून अधिक (61,45,767) मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार देशात, आतापर्यंत एकूण 166 कोटी 68 लाखांहून  अधिक (166,68,48,204) मात्रा देण्यात आल्या आहेत.

एकूण 1,83,14,397 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.सकाळी 7वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण मात्रांची सविस्तर माहिती  पुढील तक्त्यात :

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,03,95,812
2nd Dose 98,72,509
Precaution Dose 33,89,571
FLWs 1st Dose 1,83,96,880
2nd Dose 1,72,49,997
Precaution Dose 39,60,119
Age Group 15-18 years 1st Dose 4,66,52,398
2nd Dose 3,59,546
Age Group 18-44 years 1st Dose 54,13,03,255
2nd Dose 40,62,14,255
Age Group 45-59 years 1st Dose 20,03,45,885
2nd Dose 17,16,54,296
Over 60 years 1st Dose 12,49,25,432
2nd Dose 10,69,75,936
Precaution Dose 51,52,313
Precaution Dose 1,25,02,003
Total 1,66,68,48,204

 

24 तासात 2,54,076  रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यामुळे (महामारीच्या सुरवातीपासून) लागण झालेल्यांपैकी एकूण 3,92,30,198 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

परिणामी रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर 94.60% झाला आहे.

गेल्या 24 तासात 1,67,059 नव्या रुग्णांची नोंद झाली.

देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 17,43,059 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या 4.20 % इतके आहेत.

देशभरात कोविड निदान चाचणी क्षमता वाढवण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 14,28,672 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 73.06 कोटीहून अधिक (73,06,97,193) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 15.25% आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी  दर 11.69%  इतका आहे.

Exit mobile version