Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 12,729 नवे दैनंदिन रुग्ण

corona vaccination

देशात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 98.23%, मार्च 2020 पासून सर्वात उच्च स्तरावर

देशात गेल्या 24 तासात 5,65,276 कोविड 19 प्रतिबंधक लसीच्या मात्रा देण्यात आल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार आतापर्यंत एकूण 107.70 कोटीपेक्षा अधिक (1,07,70,46,116) मात्रा दिल्या आहेत. एकूण 1,08,69,517 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.

सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण लसीच्या मात्रांची गटनिहाय विभागणी पुढील प्रमाणे आहे-

 

HCWs

1st Dose 1,03,79,485
2nd Dose 92,51,816
 

FLWs

1st Dose 1,83,72,277
2nd Dose 1,60,01,188
 

Age Group 18-44 years

1st Dose 42,28,21,083
2nd Dose 14,80,13,602
 

Age Group 45-59 years

1st Dose 17,59,50,688
2nd Dose 9,82,24,169
 

Over 60 years

1st Dose 11,03,79,297
2nd Dose 6,76,52,511
Total 1,07,70,46,116

गेल्या 24 तासात 12,165 रुग्ण कोविड मुक्त झाले असून (महामारीच्या सुरवातीपासून) कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,37,24,959 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

परीणामी रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर 98.23% झाला आहे.

सलग 131 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्र शासित प्रदेश यांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

गेल्या 24 तासात 12,729 नव्या रूग्णांची नोंद झाली.

सध्या सक्रीय रुग्ण संख्या 1,48,922 इतकी असून , देशात सक्रीय रुग्णांची संख्या एकूण उपचाराधीन रुग्णांच्या 0.43% इतकी असून मार्च 2020 पासून सर्वात कमी आहे.

 देशात गेल्या 24 तासात 6,70,847 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 61.30 कोटीहून अधिक (61,30,17,614) चाचण्या केल्या आहेत.

देशभरात साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सध्या 1.25% असून गेले 42 दिवस 2% पेक्षा कमी आहे. दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 1.90% असून गेले 32 दिवस 2% पेक्षा कमी आणि 67 दिवस 3% पेक्षा कमी आहे.

Exit mobile version