Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

यंदा खरिपात तेलबियांच्या पेरणी क्षेत्रात 10 % जास्त वाढ

गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात सुमारे 59 लाख हेक्टरची वाढ

खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात विक्रमी प्रगती नोंदवत 1104.54 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून गेल्या वर्षी याच काळात 1045.18 लाख हेक्टर क्षेत्रावर ही पेरणी झाली होती. भाताची पेरणी अद्याप सुरु असून डाळी, भरड धान्य आणि तेलबिया यांची पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे. खरीप हंगामाच्या पेरणीची अंतिम आकडेवारी 1 ऑक्टोबर 2020 ला कळेल अशी अपेक्षा आहे.

आतापर्यंत खरीप पिकाच्या पेरणी क्षेत्राच्या प्रगतीवर कोविड-19 चा परिणाम झालेला नाही. सरकारच्या योजना आणि मिशन कार्यक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कृषी मंत्रालय आणि राज्य सरकारांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. सरकारकडून बियाणे, कीटकनाशके, खते, यंत्रसामग्री आणि पतपुरवठा वेळेवर उपलब्ध झाल्याने महामारीमुळे लागू झालेल्या लॉकडाऊन काळातही मोठ्या क्षेत्रावर पेरण्या शक्य झाल्या. वेळेवर कृती, तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्याचे श्रेय शेतकऱ्याकडे जाते.

S.
No.
Crop Area Sown in lakh ha %  Increase
2020-21 2019-20 2019-20
1 Rice 402.25 373.87 7.59
2 Pulses 137.87 131.76 4.64
3 Coarse cereals 179.70 177.43 1.28
4 Oilseeds 195.99 176.91 10.79
5 Sugarcane 52.46 51.75 1.37
6 Jute & Mesta 6.97 6.86 1.68
7 Cotton 129.30 126.61 2.12
Total 1104.54 1045.18 5.68

10.09.2020 पर्यंत देशात 828.6 मिमी पाऊस झाला, सर्वसामान्य पावसाची पातळी 777.3 मिमी असून 01.06.2020 ते 10.09.2020 या काळात 7 % अधिक पाऊस झाला आहे.

केंद्रीय जल आयोगाकडून मिळालेल्या माहिती नुसार 10.09.2020 रोजी देशातल्या 123 धरणात, गेल्या वर्षीच्या याच काळाच्या 102% तर गेल्या दहा वर्षाच्या सरासरी जलसाठ्याच्या 118% जलसाठा उपलब्ध आहे.

Exit mobile version