राज्यात ९३ हजार रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई, दि.१ : राज्यात आज कोरोनाच्या ५५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. आज २२४३ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९३ हजार १५४ झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख ९२ हजार ७२३ नमुन्यांपैकी १ लाख ८० हजार २९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.१६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार ३९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १२९ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.४७ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ६९ मृत्यू हे मुंबई मनपा-६, ठाणे मनपा-५, कल्याण-डोंबिवली मनपा- १, भिवंडी निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर मनपा-३, वसई-विरार मनपा-१, धुळे मनपा-१, जळगाव-८, पुणे-४, पुणे मनपा-२३, पिंपरी चिंचवड मनपा-१, सोलापूर मनपा-३, सिंधुदूर्ग-१, जालना-३, लातूर-१,उस्मानाबाद-२, नांदेड मनपा-१, अकोला मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- (७९,१४५), बरे झालेले रुग्ण- (४४,७९१), मृत्यू- (४६३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२,६७५)

ठाणे: बाधित रुग्ण- (३९,३१६), बरे झालेले रुग्ण- (१५,६२१), मृत्यू- (१०१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२१,६३१)

पालघर: बाधित रुग्ण- (६०६४), बरे झालेले रुग्ण- (२६५४), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२९९)

रायगड: बाधित रुग्ण- (४५६३), बरे झालेले रुग्ण- (२१८६), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२७३)

रत्नागिरी: बाधित रुग्ण- (६१४), बरे झालेले रुग्ण- (४४५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)

सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (२२१), बरे झालेले रुग्ण- (१५४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६२)

पुणे: बाधित रुग्ण- (२३,३१७), बरे झालेले रुग्ण- (११,५४५), मृत्यू- (७८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०,९८९)

सातारा: बाधित रुग्ण- (१११७), बरे झालेले रुग्ण- (७३०), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४३)

सांगली: बाधित रुग्ण- (३९६), बरे झालेले रुग्ण- (२२८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५७)

कोल्हापूर: बाधित रुग्ण- (८५८), बरे झालेले रुग्ण- (७१७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०)

सोलापूर: बाधित रुग्ण- (२६५२), बरे झालेले रुग्ण- (१५६३), मृत्यू- (२६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८२०)

नाशिक: बाधित रुग्ण- (४३७६), बरे झालेले रुग्ण- (२३२२), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१८३२)

अहमदनगर: बाधित रुग्ण- (४३२), बरे झालेले रुग्ण- (२७६), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४२)

जळगाव: बाधित रुग्ण- (३५०७), बरे झालेले रुग्ण- (२००६), मृत्यू- (२४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२५६)

नंदूरबार: बाधित रुग्ण- (१७८), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (९९)

धुळे: बाधित रुग्ण- (१०९६), बरे झालेले रुग्ण- (५९४), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (४४४)

औरंगाबाद: बाधित रुग्ण- (५६५१), बरे झालेले रुग्ण- (२४६०), मृत्यू- (२५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९३५)

जालना: बाधित रुग्ण- (५८३), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२२२)

बीड: बाधित रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (२०)

लातूर: बाधित रुग्ण- (३५०), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३६)

परभणी: बाधित रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५)

हिंगोली: बाधित रुग्ण- (२७०), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

नांदेड: बाधित रुग्ण- (३६४), बरे झालेले रुग्ण (२३४), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११६)

उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (२२३), बरे झालेले रुग्ण- (१७१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०)

अमरावती: बाधित रुग्ण- (५८७), बरे झालेले रुग्ण- (४१९), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०)

अकोला: बाधित रुग्ण- (१५४४), बरे झालेले रुग्ण- (१०७९), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३८६)

वाशिम: बाधित रुग्ण- (१०६), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९)

बुलढाणा: बाधित रुग्ण- (२५१), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८७)

यवतमाळ: बाधित रुग्ण- (२९६), बरे झालेले रुग्ण- (२०९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७७)

नागपूर: बाधित रुग्ण- (१५०६), बरे झालेले रुग्ण- (११९८), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९३)

वर्धा: बाधित रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६)

भंडारा: बाधित रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२)

गोंदिया: बाधित रुग्ण- (१३१), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८)

चंद्रपूर: बाधित रुग्ण- (९५), बरे झालेले रुग्ण- (५६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९)

गडचिरोली: बाधित रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७)

इतर राज्ये: बाधित रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७१)

एकूण: बाधित रुग्ण-(१,८०,२९८), बरे झालेले रुग्ण-(९३,१५४), मृत्यू- (८०५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१६),ॲक्टिव्ह रुग्ण-(७९,०७५)

(टीप-आज राज्यात एकूण नोंदविलेल्या १९८ मृत्यूंपैकी ६९ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि १२९ मृत्यू हे त्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६९, मीरा भाईंदर -२६, ठाणे मनपा -१७, कल्याण डोंबिवली -४, जळगाव – ३, पुणे -३,नवी मुंबई -१, उल्हास नगर -१, भिवंडी -१, पालघर -१, वसई विरार -१, धुळे -१ आणि अकोला-१ यांचा समावेश आहे. हे १२९ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड१९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

00000

Tags: पीक कर्ज