थंडीपासून केळीचे असे करा संरक्षण

केळी पिकावर कमी तापमानामुळे नवीन पाने येण्याचा वेग मंदावणे, केळीच्या नवीन पानांच्या कडा करपणे, झाडांची वाढ मंदावणे, मुळांची अन्नद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता कमी होणे परिणामी, पाने पिवळसर होणे, तसेच बिगर हंगामी विनाशिफारशीत मार्च-एप्रिल लागवडीमध्ये घड नैसर्गिकरीत्या न निसवता ते अडकणे इत्यादी विपरीत परिणाम आढळतात.

उपाययोजनाः
१)शिफारशीत पाण्याची मात्रा रात्री किंवा पहाटे देण्यात यावी.
२)बागेत तापमानवाढीच्या दृष्टीने पहाटेच्या वेळी ओलसर काडीकचरा वापरून शेकोट्या करून धूर निर्माण करावा.
३)घडातील पूर्ण फण्या उमलल्यानंतर केळफूल कापावे. तद्नंतर त्यावर ०.५टक्के पोटॅशिअम डायहायड्रोजन फॉस्फेट + १ टक्का युरियाच्या द्रावणाची फवारणी करावी.
४)निसवलेल्या केळीच्या घडांना २ टक्के सच्छिद्रता असलेल्या पांढर्‍यापॉलिथिनच्या पिशव्यांचे आवरण घालावे.
५)नवीन लागवड केलेल्या झाडांना फवारणीतून अन्नद्रव्ये उपलब्ध होण्याच्या दृष्टीने झाडांवर १९ ः १९ ः १९ या विद्राव्य खताची २० ग्रॅम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.

केळी संशोधन केंद्र, जळगाव