गेल्या 24 तासात 9765 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.35%

गेल्या 24 तासात कोविड-19 प्रतिबंधक लसींच्या  80,35,261 मात्रा देण्यात आल्याने

भारताने 124.96 (1,24,96,19,515)  कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे.

1,29,79,828 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

HCWs 1st Dose 1,03,83,998
2nd Dose 95,09,164
 

FLWs

1st Dose 1,83,79,363
2nd Dose 1,65,20,117
 

Age Group 18-44 years

1st Dose 46,11,59,223
2nd Dose 23,00,04,760
 

Age Group 45-59 years

1st Dose 18,53,50,013
2nd Dose 12,22,12,176
 

Over 60 years

1st Dose 11,60,67,930
2nd Dose 8,00,32,771
Total 1,24,96,19,515

 

गेल्या 24 तासांत 8548 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 3,40,37,054

झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.35% झाला आहे.

केंद्र आणि राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेश यांच्या शाश्वत आणि परस्पर सहकार्याच्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून सलग 158 दिवसांपासून 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाल्याचा कल कायम राहिला आहे.

गेल्या 24 तासात 9,765 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 99,763 आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.29% आहे. मार्च 2020 पासूनचे हे सर्वात कमी प्रमाण आहे.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असून, गेल्या 24 तासांमध्ये एकूण 10,98,611  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 64.35  (64,35,10,926) कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.85% असून गेल्या 18 दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.89% असून गेले 59 दिवस हा दर 2 % पेक्षा कमी आहे आणि गेले सलग 94 दिवस हा दर 3% पेक्षा कमी आहे.