Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

आमच्याबद्दल

पंढरीची विठूमाऊली आणि शेतकरी यांचं जन्मोजन्मांपासून अतूट नातं. खरीप, रब्बीच्या पेरण्या आटोपल्या की युगे अठठावीस विटेवरी उभ्या या माऊलीच्या भेटीची वारकरी असलेल्या शेतकºयांना आस लागते.

खरा विठुभक्ताला तर सगळीकडेच मग ही विठाई दिसायला लागते. अगदी शेतातही, मग तो या काळ्या आईमधल्या विठ्ठलाची भक्तीभावाने, मनोभावाने सेवा करतो. विठूमाऊलीही त्याला भरभरून देते, समृदध करते, समाधानी करते.

तेच समाधान आणि समृध्दी आमच्या ‘कृषी पंढरी’ या पोर्टलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

शेती, ग्रामविकास यांसह दैनंदिन घडामोडी, ज्ञान-मनोरंजन, उपयुक्त माहिती अशा विविध पैलूंवर मल्टीमीडिया आशयाचा वापर करून बळीराजाला ज्ञान आणि माहिती समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

वरिष्ठ पत्रकार विवेक पंडित राजूरकर हे ‘कृषी पंढरी’चे संस्थापक-संपादक आहेत.

संपादकांविषयी :

Vivek Rajurkar
विवेक राजूरकर, संपादक

विवेक पंडित राजूरकर यांना प्रिंट, डिजिटल आणि टेलिव्हिजन या माध्यमक्षेत्रांचा सुमारे 15 हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी संपादन केलेली असून कृषी शास्त्रातही ते उच्च पदवीधर आहेत. त्यामुळे शेती आणि शेतकरी हा त्यांचा जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय राहिलेला आहे.

त्यांच्या पत्रकारितेतील प्रवासाची सुरूवात सन 2005 पासून केसरी वृत्त या स्थानिक वृत्तवाहिनीपासून झाली. त्यानंतर त्यांनी दैनिक केसरी सोबत वृत्त प्रतिनिधी म्हणून काम करण्यास सुरूवात केली. सन 2007 मध्ये त्यांनी झी 24 तास वृत्तवाहिनीसोबत काम करण्यास सुरूवात केली. कृषी उच्च पदवीधर असल्याने त्यांनी तेथे शेती आणि शेतकºयांशी संबंधित ‘पीक-पाणी’ आणि ‘जरा हटके’ या नावाजलेल्या वृत्त मालिकांची निर्मिती केली. पुढे ‘साम टीव्ही’ सोबत त्यांनी ‘पंचनामा’ या गुन्हेगारी वृत्त कार्यक्रमाचे निर्माता म्हणूनही काही काळ काम केले.

टीव्ही आणि प्रिंट माध्यमांप्रमाणेच त्यांनी डिजिटल माध्यमातही आपल्या सरस कामगिरीचा ठसा उमटवला. शेती, विकास आणि एकूणच ग्रामीण भारताच्या विकासासाठी वाहिलेल्या जरा वेगळ्या धाटणीच्या ‘भारत फॉर इंडिया’ या डिजिटल माध्यमाचे ते औरंगाबाद विभागाचे ‘ ब्युरो चिफ’ होते. पुणे येथील प्रसिद्ध माध्यम संस्था ‘इमेज मीडिया’ सोबतही त्यांनी कंटेंट डेव्हलपर म्हणून काम केले आहे.

तसेच ‘एएम न्यूज’ या नव्या मराठी उपग्रह वृत्तवाहिनीच्या पदापर्णाच्या काळात त्यांनी वरिष्ठ निर्माता पदाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.

सध्या ते ‘आयकॉनिक मीडिया’चे संचालक म्हणून काम करत आहेत. शेतकºयांसह सर्वसामान्यांना माहिती, ज्ञान आणि मनोरंजन देणारे परिपूर्ण डिजिटल पोर्टल असावे या संकल्पनेतून त्यांनी ‘कृषी पंढरी’ या आगळ्यावेगळ्या पोर्टलची निर्मिती आणि सुरूवात केली असून त्याच्या संपादकपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत.

© Copyright : Krishi Pandhari,2020. Designed and Developed by mediaShilp

 

Exit mobile version