प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 09 मार्च रोजी औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 10 ते 12 मार्च दरम्यान तूरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग कमी झालेला आहे व जमिनीतील ओलावा वाढलेला आहे. तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्यामूळे पिकास पाणी देण्याची आवश्यकता नाही.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारश केली आहे.
पीक व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेला हरभरा गोळा करून पॉलिथीन शीटने झाकून ठेवावा. मळणी केलेला हरभरा सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवावा. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. काढणी केलेले कणसे गोळा करून पॉलिथीन शीटने झाकून ठेवावीत. मळणी केलेली रब्बी ज्वारी सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापणी केलेला गहू गोळा करून पॉलिथीन शीटने झाकून ठेवावा. मळणी केलेल्या गव्हाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. सध्या हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरू आहेत. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, हळदीची उघडयावर साठवण करू नये.
फळबागेचे व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, जुन मध्ये लागवड केलेल्या केळीच्या बागेत केळीचे झाड कोलमडु नये म्हणुन झाडास आधार दयावा. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या संत्रा/मोसंबी फळांची लवकरात लवकर काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
भाजीपाला
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार आसलेल्या भाजीपाला पिकांची तसेच टरबूज, खरबूज इत्यादी पिकांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करावी.
फुलशेती
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणीस तयार असलेल्या फुलपिकांची काढणी व प्रतवारी करून, ती बाजारपेठेत विक्रीस पाठवावी.
चारा पिके
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पावसात भिजल्यास त्याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.
पशुधन व्यवस्थापन
वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) व तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच औरंगाबाद व जालना जिल्हयात गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे, जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये. निवा-याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. पशूधनास खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवावे, ट्रक्टर आणि इतर धातूंच्या शेती अवजारांपासून दूर ठेवावे व पशुधनास झाडाखाली जमा होऊ देऊ नये. तसेच पाऊस चालू होण्याच्या वेळी झाडाच्या आडोशाला थांबु नये.
सामुदायिक विज्ञान
पिंपळाच्या सालीची भुकटी 0.5% सोडियम हायड्रॉक्साईडच्या आम्लारीयुक्त द्रावणामध्ये उकळून त्यापासून रंक काढता येतो. हा रंग सुती, रेशमी आणि उनी धागे रंगविण्यासाठी अनुक्रमे 10%, 10% आणि 5% या प्रमाणात घेऊन वापरता येतो. पिंपळाच्या सालीपासून रंग काढण्यासाठी 30 मिनिटांचा व सुती धागे रंगविण्यासाठी 45 मिनिटांचातर रेशमी आणि उनी धागे रंगविण्यासाठी 30 मिनिटांचा वेळ प्रमाणित करण्यात आला. सुती धागे रंगविण्यापूर्वी 10% हरडयाच्या द्रावणात प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तुरटी, क्रोम, कॉपर सल्फेट आणि फेरस सल्फेट या रंगबंधकाचा वापर करून मंद विटकरी ते गडद तपकिरी अशा विविध रंगछटा मिळतात. धुणे, घासणे, घाम आणि सूर्यप्रकाश या सर्व बाबींसाठी रंगाचा पक्केपणा अतिशय चांगला ते उत्तम आहे.
सौजन्य : डॉ. कैलास कामाजी डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा,वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी