गेल्या 24 तासात 6,396 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

भारतातील उपचाराधीन रुग्णांची सध्याची संख्या 69,897

गेल्या 24 तासात  24.84  (24,84,412)  लाख लसीींच्या मात्रा देण्यात आल्याने भारतातील कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाने आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, 178.29  (1,78,29,13,060)  कोटी मात्रा देण्याचा टप्पा पार केला आहे.

2,06,05,684 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs 1st Dose 1,04,01,859
2nd Dose 99,71,780
Precaution Dose 42,14,216
FLWs 1st Dose 1,84,10,046
2nd Dose 1,74,51,962
Precaution Dose 63,12,690
Age Group 15-18 years 1st Dose 5,51,46,865
2nd Dose 2,94,46,462
Age Group 18-44 years 1st Dose 55,22,22,294
2nd Dose 44,72,33,716
Age Group 45-59 years 1st Dose 20,23,40,255
2nd Dose 18,08,32,789
Over 60 years 1st Dose 12,64,67,129
2nd Dose 11,26,18,005
Precaution Dose 98,42,992
Precaution Dose 2,03,69,898
Total 1,78,29,13,060

 

गेल्या 24 तासांत 13,450 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,23,67,070 झाली आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.64% झाला आहे.

गेल्या 24 तासात 6,396 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या  69,897 आहे.  देशातील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती 0.16% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता वाढवली जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये एकूण 9,23,351  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 77 कोटी 9 लाखांहून (77,09,73,356) लाखांहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

देशभरात चाचणी क्षमता वाढवण्यात आली असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.90% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.69% आहे.