इंधन दरवाढ रोखण्यासाठी भारत उचलणार हे पाऊल

सद्य भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा बाजारपेठ  तसेच ऊर्जा पुरवठ्यातील संभाव्य अडथळ्यांवर भारताचे  बारकाईने लक्ष

सद्य भू-राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऊर्जा बाजारपेठ  तसेच ऊर्जा पुरवठ्यातील संभाव्य अडथळ्यांवर भारत सरकार बारकाईने लक्ष ठेवून आहे.

आपल्या नागरिकांसाठी ऊर्जा न्याय सुनिश्चित करण्याच्या दृष्टीकोनातून आणि भविष्यातील  निव्वळ शून्य उत्सर्जनाच्या दिशेने ऊर्जा संक्रमणासाठी,स्थिर किमतींवर सुरु असलेल्या पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारत योग्य कार्यवाही  करण्यास सज्ज आहे.

बाजारातील अस्थिरता कमी करण्यासाठी आणि कच्च्या तेलाची भाववाढ कमी राहण्याच्या अनुषंगाने,  स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजेच पेट्रोलियमच्या राखीव साठ्यामधून  कच्चे तेल मोकळे करण्याच्या  उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी भारत वचनबद्ध आहे.