वनामकृवित रेशीम उद्योग कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्‍न

केंद्रिय रेशीम मंडळ परभणी कार्यालय व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील रेशीम संशोधन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१६ ते १८ फेब्रुवारी दरम्‍यान तीन दिवसीय “रेशीम उद्योग कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. प्रशिक्षणाचे उदघाटन कुलसचिव डॉ. धीरजकुमार कदम यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले तर प्रमुख अतिथी उपकुलसचिव डॉ. रविद्र देशमुख, मार्गदर्शक अनुसंधान विस्‍तार केंद्राचे शास्‍त्रज्ञ श्री. अशोक जाधव, प्रभारी अधिकारी डॉ चंद्रकांत लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ धीरजकुमार कदम म्‍हणाले की, शेतक­यांनी एकच एक पिक पध्दती बदलून दिड ते दोन एकर क्षेत्रावर रेशीम उद्योग केला तर आर्थिक उन्नती होईल. तर उपकुलसचिव डॉ. रविद्र देशमुख म्‍हणाले की, कापूस व उस या पिकानंतर रेशीम उद्योगाकडे शेतकरी वळले तर कोष उत्पादना शिवाय विणकरबुणकररंगारी आदीना गावातच रोजगार उपलब्ध होईल, गावातुनच वस्त्र उद्योग वाढिस लागेल व गावांचे अर्धकारण बळकट होइल.

यावेळी डॉ चंद्रकांत लटपटे यांनी  तुती रोप वाटीकायंत्राने तुती  छाटणीकोष काढणीचे व तुती पाने कापणीचे प्रात्यक्षिक दाखवुन रेशीम शेतक­यांनी गट स्थापन करून लहाण मशिन खरेदी करण्याचे आवाहन केले.

प्रशिक्षणास बीड जिल्हयातुन श्री. सर्जेराव खरवडेशिवमसिंह विठ्ठल यादवनांदेड येथुन श्री. सुभाष भिमराव सज्जनमानका देवी ता.गंगाखेड येथुन श्री.नागनाथ रावन देवकत्त्तेश्री.बाळासाहेब गणेश पुकाणेव देऊळगाव (दु.) येथुन श्री.मोतीराम कुंडलीक दुधाटे, जिल्हा रेशीम कार्यालयाचे श्री. एम.एल.आगाम व कांचन मोहन जाधव आदींची उपस्थिती होती. समारोपीय कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थीना किटकशास्‍त्र विभागाचे विभाग प्रमुख यांच्‍या हस्‍ते  प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी श्री.धनंजय मोहोडडॉ.संजोग बोकन, श्री. हरिश्‍चंद्र ढगे, श्री. व्यास, शुभांगी साबळे आदींनी परिश्रम घेतले.