रिझर्व बॅंकेकडून व्याजदरात कोणतीही कपात नाही

महागाई दर आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींवरून सामान्यांना दिलासा देण्यासाठी देशांतर्गत चलनवाढीच्या स्थितीबाबत रिझर्व बॅंक रिव्हर्स रेपो दरात बदल करेल अशी अपेक्षा होती. जेणेकडून महागाई कमी झाली असती. मात्र, रिझर्व्ह बँकेने नवे पतधोरण जाहीर केले असून रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. तो 4 टक्के इतका कायम ठेवण्यात आला आहे तर रिव्हर्स रेपो दर 3.35 इतका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची अपेक्षा फोल ठरली आहे.

बॅंकेने आज आपले नवे पतधोरण जाहीर केले. सलग दहाव्यांदा बॅंकेने रेपो आणि रिव्हर्स रेपोदरात कोणताही बदल केलेला नाही. तर येत्या आर्थिक वर्षात विकासदर 7.8 टक्के राहण्याचा अंदाज रिझर्व बॅंकेने व्यक्त केलाआहे.

याबाबत रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास म्हणाले, “जागतिक बाजारपेठेत कोरोना महासाथीमुळे अनेक आव्हाने समोर आली. भारतालादेखील अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी आरबीआयनेदेखील मोठी भूमिका बजावली आहे. आता कोरोना महासाथीला पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी भारत अधिक चांगल्या स्थितीत आहे.”
मागील काही महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाचे दर वाढत आहे. अनेक देशांमध्ये महागाईचा दर वाढला आहे. त्यामुळे संबंधित देशांच्या मध्यवर्ती बँकेंकडून व्याजदर वाढवण्यात आले आहे. कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत असल्याने महागाईचा भडका उडण्याचा धोका आहे.