महाराष्ट्र बँकेत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने जनरलिस्ट ऑफिसर्सच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत . बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ऑफिसर्स स्केल-II आणि स्केल-III च्या पदांसाठी भरती केली जाणार आहे.

अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in ला भेट द्यावी लागेल. येथे सध्याच्या रिक्त पदांची लिंक दिलेली असते. ज्यामध्ये स्केल II आणि स्केल III प्रकल्प 2022-23 मध्ये सामान्य अधिकार्‍यांच्या भर्तीची लिंक असेल.
नोंदणीच्या लिंकवर क्लिक करा आणि विचारलेली माहिती भरा. त्यानंतर नोंदणी क्रमांकाच्या मदतीने अर्ज भरा.

रिक्त पदांची माहिती :
बँक ऑफ महाराष्ट्रने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जनरलिस्ट ऑफिसर्स (GO) च्या 500 पदांची नियुक्ती करायची आहे. त्यापैकी जनरलिस्ट ऑफिसर स्केल-II ची 400 पदे आणि जनरलिस्ट ऑफिसर स्केल-III ची 100 पदे भरायची आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 203 जागा ठेवण्यात आल्या आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी 137, आर्थिक दुर्बलांसाठी 50, एसी प्रवर्गासाठी 37 आणि एसटीसाठी 75 जागा ठेवण्यात आल्या आहेत.

अंतिम मुदत :
5 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून ती 22 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. तर BOM जनरल ऑफिसर परीक्षा १२ मार्च २०२२ रोजी होणार आहे.