सरकारने स्थावर मालमत्तेच्या विक्रीवर टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स (TDS) च्या तरतुदींमध्ये बदल प्रस्तावित केले आहेत. या अंतर्गत, ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अकृषिक स्थावर मालमत्तेच्या विक्रीवर विक्री किंमत किंवा मुद्रांक शुल्क यापैकी जे जास्त असेल त्यावर एक टक्का टीडीएस लागू होईल.
सध्या काय आहे नियम ?
सध्या, ही वजावट केवळ स्थावर मालमत्तेच्या मूल्याच्या आधारावर केली जाते. यामध्ये मुद्रांक शुल्काचा विचार केला जात नाही. नवीन नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होणार आहे.
तरच हा नियम लागू :
सध्या ५० लाख रुपयांपेक्षा जास्त अकृषिक मालमत्तेच्या व्यवहारावर एक टक्का टीडीएसचा नियम आहे. या एक टक्का टीडीएससाठी मालमत्तेचे मूल्य आधार मानले जाते. हा नियम फक्त ५० लाख रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या व्यवहारांसाठी लागू आहे.