भारतात रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 94. 60%
देशात , गेल्या 24 तासात कोविड प्रतिबंधक लसीच्या 61 लाखाहून अधिक (61,45,767) मात्रा, पात्र नागरिकांना दिल्या असून आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार देशात, आतापर्यंत एकूण 166 कोटी 68 लाखांहून अधिक (166,68,48,204) मात्रा देण्यात आल्या आहेत.
एकूण 1,83,14,397 सत्रांद्वारे या मात्रा देण्यात आल्या आहेत.सकाळी 7वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या एकूण मात्रांची सविस्तर माहिती पुढील तक्त्यात :
Cumulative Vaccine Dose Coverage | ||
HCWs | 1st Dose | 1,03,95,812 |
2nd Dose | 98,72,509 | |
Precaution Dose | 33,89,571 | |
FLWs | 1st Dose | 1,83,96,880 |
2nd Dose | 1,72,49,997 | |
Precaution Dose | 39,60,119 | |
Age Group 15-18 years | 1st Dose | 4,66,52,398 |
2nd Dose | 3,59,546 | |
Age Group 18-44 years | 1st Dose | 54,13,03,255 |
2nd Dose | 40,62,14,255 | |
Age Group 45-59 years | 1st Dose | 20,03,45,885 |
2nd Dose | 17,16,54,296 | |
Over 60 years | 1st Dose | 12,49,25,432 |
2nd Dose | 10,69,75,936 | |
Precaution Dose | 51,52,313 | |
Precaution Dose | 1,25,02,003 | |
Total | 1,66,68,48,204 |
24 तासात 2,54,076 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत त्यामुळे (महामारीच्या सुरवातीपासून) लागण झालेल्यांपैकी एकूण 3,92,30,198 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
परिणामी रुग्ण कोविडमुक्त होण्याचा दर 94.60% झाला आहे.
गेल्या 24 तासात 1,67,059 नव्या रुग्णांची नोंद झाली.
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 17,43,059 असून उपचाराधीन रुग्ण, एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या 4.20 % इतके आहेत.
देशभरात कोविड निदान चाचणी क्षमता वाढवण्यात येत असून देशात गेल्या 24 तासात 14,28,672 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 73.06 कोटीहून अधिक (73,06,97,193) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचण्यांच्या क्षमतेत वाढ होत असताना साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 15.25% आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 11.69% इतका आहे.