देशाचा विकासदर ९.२ टक्के राहणार

देशाची अर्थव्यस्था कोरोना संकटातून पूर्णपणे सावरली असून चालू आर्थिक वर्षात विकासदर ९.२ टक्के राहील,असा आशावाद केंद्र सरकारने व्यक्त केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ या वर्षासाठीच्या आर्थिक पाहणी अहवालात ही बाब नमूद केली आहे.

या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षासाठी ९.२ टक्के विकासदराचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर पुढील आर्थिक वर्षात तो ८ ते ८.५ टक्के राहील, असे भाकीत करण्यात आले आहे.

मागील आठ महिन्यांत अर्थचक्राने वेग घेतला असून जीएसटी संकलन सरासरी एक लाख कोटींवर असल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी आणि रिझर्व्ह बँकेने विकासदराचे आश्वासक अंदाज व्यक्त केले आहेत. चालू आर्थिक वर्षात राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने ९.२ टक्के विकासदराचा अंदाज व्यक्त केला आहे. तर रिझर्व्ह बॅंकेने यंदा तो ९.५ टक्के इतका राहील, असे भाकीत केले होते.